पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा वारसा जतन करण्याच्या अथक परीश्रमांची प्रशंसा केली आहे. देशाचा वारसा जतन आणि वर्धिष्णू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे श्री. मोदी म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, श्री अमित शहा यांनी इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स या केंद्राच्या आवारातील वैदिक हेरिटेज पोर्टल आणि कला वैभव या आभासी वस्तूसंग्रहालयाचे आज उदघाटन केले, असल्याची माहिती या केंद्राने ट्विटर वरून दिली.या ट्विट थ्रेडला पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला आहे.
वैदिक हेरिटेज पोर्टल हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये तयार करण्यात आल्याचीही माहिती आयजीएनसीए(IGNCA) दिल्ली यांनी दिली आहे. यामध्ये 18 हजारांहून अधिक वैदिक मंत्रांचे ध्वनीफिती तसेच चित्रफिती उपलब्ध आहेत.
केंद्राच्या विकासाविषयी आयजीएनसीए (IGNCA) दिल्ली यांनी दिलेल्या ट्विट थ्रेडला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी ट्विट केले;
"शानदार प्रयत्न! देशाचा वारसा वृध्दिंगत करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे."
बेहतरीन प्रयास! देश की विरासत को संजोने और संवारने के लिए हमारी सरकार प्रतिबद्ध है। https://t.co/AgSuFcrBZm
— Narendra Modi (@narendramodi) March 25, 2023