गर्भामधील द्राक्षाच्या आकाराच्या हृदयावर 90 सेकंदांमध्ये दुर्मिळ वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतीय डॉक्टरांचे कौशल्य आणि नवोन्मेषाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचे ट्विट सामायिक करून पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“भारतीय डॉक्टरांचा, त्यांच्या कौशल्याचा आणि नवोन्मेषाबद्दल अभिमान वाटतो.”
Proud of India’s doctors for their dexterity and innovation. https://t.co/Rud6hMY7OG
— Narendra Modi (@narendramodi) March 15, 2023