पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात,चंदीगड येथील फूड स्टॉलकाने कोविड -19 लसीकरणासाठी लोकांना उद्युक्त करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्याचे कौतुक केले. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, आपली मुलगी आणि भाची यांच्या सूचनेवरून फूड स्टॉलचे मालक संजय राणा यांनी, ज्यांनी कोविड लस घेतली होती त्यांना मोफत छोले भटूरे खायला देण्याची सुरवात केली.
#चंडीगढ़ के संजय राणा जी की प्रेरणादायक और नेक कहानी
— PIB in Chandigarh (@PIBChandigarh) July 25, 2021
संजय राणा जी के छोले-भटूरे मुफ़्त में खाने के लिए आपको दिखाना पड़ेगा कि आपने उसी दिन vaccine लगवाई है | Vaccine का message दिखाते ही वे आपको स्वादिष्ट छोले–भटूरे दे देंगे
- पीएम श्री @narendramodi#MannKiBaat @vpsbadnore pic.twitter.com/r5QGypN8ao
पंतप्रधान म्हणाले, चंदीगड येथील सेक्टर- 29 मधे एक विक्रेते सायकल वरून छोले भटूरेची विक्री करतात आणि एखाद्या व्यक्तीने अगदी त्याच दिवशी लस घेतली असल्याचे दाखवले तर, त्याला त्यादिवशी विनामूल्य खायला देतात. त्यांच्या या कामाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि ते म्हणाले की यावरून समाजाच्या कल्याणासाठी पैशापेक्षा सेवाभाव आणि कर्तव्यभावना आवश्यक आहे, हे सिद्ध होत आहे.