युगांडा बरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधाना चालना मिळाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
युगांडामधील इंडिया एक्झिम बँकेने निधी पुरवलेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या,पाईपद्वारे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा यंत्रणेबद्दल केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर यांनी केलेले ट्विट शेअर करताना, पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;
“हा प्रकल्प, युगांडा बरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधाना बळ देण्याबरोबर,शाश्वत विकासालाही चालना देईल.”
In addition to boosting friendship with Uganda, this project will further sustainable development. https://t.co/ixDTnPOmqD
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2023