1.5 लाख आयुष्मान भारत – आरोग्य आणि निरामयता केंद्रांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे नव्या भारताला नवीन ऊर्जा मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की निरोगी नागरिकांमध्ये भारताची समृद्धी वसली आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“निरोगी नागरिकांमधेच भारताची समृद्धी वसली आहे. विक्रमी संख्येने उभारण्यात आलेली ही आरोग्य आणि निरामयता केंद्रे या दिशेने मोठी भूमिका बजावतील. हे यश नव्या भारताला नवीन ऊर्जा देईल”.
स्वस्थ नागरिकों में ही भारतवर्ष की समृद्धि निहित है। इस दिशा में रिकॉर्ड संख्या में बने ये हेल्थ एंड वेलनेस सेंटर्स बड़ी भूमिका निभाएंगे। यह उपलब्धि न्यू इंडिया में एक नई ऊर्जा भरने वाली है। https://t.co/OfBsRIorsR
— Narendra Modi (@narendramodi) December 29, 2022