परीक्षा पे चर्चा 2023 या कार्यक्रमाशी निगडित रोचक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आमंत्रित केले आहे. विद्यार्थ्यांसाठी तणावमुक्त वातावरण तयार करण्यासाठी एकत्रितपणे काम करायची आवश्यकता असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या एका ट्विटचा दाखला देत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे.
“परीक्षा पे चर्चा 2023 या कार्यक्रमासाठी मी परीक्षा योद्ध्यांना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना रंजक उपक्रमांत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करतो. आपल्या विद्यार्थ्यांसाठी तणावरहीत वातावरण तयार करण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करूया. #परीक्षा पे चर्चा 2023”
I call upon all #ExamWarriors, their parents and teachers to take part in these interesting activities relating to Pariksha Pe Charcha 2023. Let us collectively work towards creating a stress free environment for our students. #PPC2023 https://t.co/ovubThyvP1
— Narendra Modi (@narendramodi) November 30, 2022