लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या 'दिवाळी मिलन' कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात त्यांनी प्रत्येकाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. देशाने कोविड महामारीशी दिलेल्या लढ्याबद्दल पंतप्रधानांनी चर्चा केली.
या अज्ञात शत्रूशी लढताना देशाने एकता आणि बंधुत्व यांचे दर्शन घडवल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
महामारीचा परिणाम म्हणून समाजात आणि प्रशासनात झालेल्या सकारात्मक बदलाबाबत त्यांनी भाष्य केले. या बदलामुळे समाजामध्ये आपत्तींचा सामना करण्याचे सामर्थ्य वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
कठीण काळात आपल्यात असलेल्या सुप्त सामर्थ्याची जाणीव माणसांना, प्रक्रियांना आणि संस्थांना होते यावर भर देत त्यांनी यापासून प्रेरणा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. 2047 आणि त्यानंतरच्या काळासाठी देशाचा पाया मजबूत करण्यात या दशकाचे महत्व अधोरेखित करत देशाला नवीन उंचीवर नेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील आपण सर्वांनी आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करत एकत्रितपणे काम करायला हवे असे पंतप्रधानांनी सांगितले.