पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज गयानाच्या आघाडीच्या क्रिकेट खेळाडूंशी संवाद साधला आणि क्रिकेटने भारत आणि गयाना यांच्यात जवळीक प्रस्थापित करून, उभय देशातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ केले आहेत, असे नमूद केले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले,
“क्रिकेटच्या माध्यमातून जोडून घेत आहे! गयानाच्या आघाडीच्या क्रिकेट खेळाडूंशी झाला एक आनंददायी संवाद. या खेळाने आपली राष्ट्रे जवळ आणली आहेत आणि आपले सांस्कृतिक संबंध अधिक दृढ केले आहेत.”
Connecting over cricket!
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2024
A delightful interaction with leading cricket players of Guyana. The sport has brought our nations closer and deepened our cultural linkages. pic.twitter.com/2DBf2KNcTC