पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभाई पटेल पोलीस अकादमी येथे भारतीय पोलीस दलाच्या प्रशिक्षणार्थ्यांसमवेत दीक्षांत परेड सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले, अकादमीतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या युवा आयपीएस अधिकाऱ्यांशी नियमितपणे संवाद साधत असतो, मात्र यावर्षी कोरोनाविषाणू परिस्थितीमुळे तुम्हाला भेटणे शक्य झाले नाही. पण, माझ्या कारकिर्दीत मी नक्कीच तुम्हाला भेटेन.
पंतप्रधानांनी आयपीएस प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले प्रशिक्षणार्थ्यांनी गणवेशाची शक्ती दाखवण्याऐवजी त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. “तुमच्या खाकी गणवेशाविषयीचा आदर कधीही गमावू नका. विशेषतः या कोविड-19 दरम्यान पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे खाकी वर्दीचा मानवी चेहरा सार्वजनिक आठवणीत कोरला गेला आहे,” असे ते म्हणाले.
आयपीएस प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आतापर्यंत या सुरक्षित वातावरणात तुम्ही प्रशिक्षणार्थी होता. पण, तुम्ही या अकादमीतून बाहेर पडताक्षणी, एका रात्रीतून परिस्थिती बदलेल. तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. सजग राहा, तुमच्याबद्दलची पहिली प्रतिमा ही शेवटची प्रतिमा आहे. ज्या-ज्या ठिकाणी तुमची बदली होईल, ही प्रतिमा तुमच्या मागे येईल.”
पंतप्रधानांनी प्रशिक्षणार्थ्यांना धान्यातील भूसकट ओळखण्याविषयी सल्ला दिला. ते म्हणाले, कान बंद करु नका, कानाने ऐकलेल्या गोष्टी फिल्टर करायला शिका. ज्यावेळी फिल्टर गोष्टी मेंदूपर्यंत पोहचतील, त्याची तुम्हाला मदत होईल, कचरा बाहेर काढून तुमचे हृदय शुद्ध राहिल.
पंतप्रधानांनी प्रशिक्षणार्थींना त्यांनी धारण प्रत्येक ठिकाणी आपुलकीची आणि अभिमानाची भावना विकसित करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रशिक्षणार्थींना सर्वसमान्यांविषयी करुणा दाखविण्याची विनंती केली. ते म्हणाले, भीती दाखवून त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा प्रेमाने लोकांची मने जिंकणे दीर्घ काळ टिकून राहिल.
कोविड-19 संक्रमण काळात पोलिसांची मानवी बाजू समोर आल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.
पंतप्रधानांनी गुन्हे सोडविण्यास मदत करणाऱ्यासाठी कॉन्स्टब्युलरी इंटेलिजन्सच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी प्रशिक्षणार्थींना तंत्रज्ञानाचा कमाल वापर करण्याबरोबरच वास्तव पातळीवरील गुप्त माहितीचे महत्त्व विसरु नये, असे सांगितले. ते म्हणाले, मोठ्या प्रमाणावरील माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची कमतरता नाही. पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेली माहिती म्हणजे मालमत्ता असल्याचे सांगितले.
पंतप्रधान म्हणाले, गेल्या काही वर्षांत एनडीआरएफ आणि एसडीआरएफने आपत्तीच्या काळात ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यामुळे पोलीस सेवेला नवी ओळख मिळाली आहे. आपापल्या भागात एनडीआरएफचे गट आयोजित करुन नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशिक्षण कधीही कमी लेखू नये, यावर त्यांनी भर दिला. प्रशिक्षण म्हणजे शिक्षेसाठी केलेली पोस्टींग आहे, ही भावना मनातून काढा, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, दोनच दिवसांपूर्वी मिशन कर्मयोगी सुरु केले आहे. आपल्याकडील सात दशकं जुन्या नागरी सेवांमधील हा क्षमतावृद्धी आणि कामाप्रतीचा दृष्टीकोन याविषयीची सर्वात मोठी सुधारणा आहे. नियम-आधारीत दृष्टीकोन ते भूमिका-आधारीत दृष्टीकोन हा यातील बदल आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, यामुळे प्रतिभेचे मॅपिंग आणि प्रशिक्षण सुलभ होईल. योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची नियुक्ती होण्यास याची मदत होईल.
पंतप्रधान म्हणाले, तुमचा हा एक असा व्यवसाय आहे जेथे अनपेक्षितपणे कोणत्याही घटनेस सामोरे जाण्याचे प्रमाण खूप उच्च असते आणि तुम्ही सर्वांनी सतर्क असले पाहिजे आणि त्यासाठी तयार असले पाहिजे. यात एक उच्च पातळीचा ताण आहे आणि म्हणूनच आपल्या जवळच्या आणि प्रियजनांबरोबर संवाद खूप महत्वाचा आहे. वेळोवेळी, विशेषतः सुट्टीच्या दिवशी शिक्षकांना किंवा तुम्हाला मौल्यवान सल्ला देणाऱ्यांना भेटा.
पंतप्रधानांनी पोलिसिंगमध्ये तंदुरुस्तीचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, प्रशिक्षणादरम्यान प्राप्त केलेली तंदुरुस्ती टिकवली पाहिजे. जर तुम्ही तंदुरुस्त असाल, तर तुमचे सहकारी तंदुरुस्त असतील, त्यांना तुमच्यापासून प्रेरणा मिळेल.
पंतप्रधानांनी आवाहन केले की, गीतेतील श्लोक लक्षात ठेवून महान लोकांचा आदर्श घ्यावा.
“यत्, यत् आचरति, श्रेष्ठः,
तत्, तत्, एव, इतरः, जनः,
सः, यत्, प्रमाणम्, कुरुते, लोकः,
तत्, अनुवर्तते।