पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. वाराणसीतील भाजप कार्यकर्त्यांशी झालेल्या ऑडिओ संवादात पंतप्रधान मोदींनी विकासाप्रती भाजपच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. कार्यकर्त्यांशी झालेल्या या संवादावेळी त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉरची पुनर्स्थापना, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि आरोग्यसेवा विकास इत्यादींसह अनेक विषयांवर चर्चा केली.
एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना, पंतप्रधान मोदींनी त्याला सरकारच्या कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची सूचना केली, पंतप्रधान म्हणाले की, "तुम्ही शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या वापराबद्दल जागरूक केले पाहिजे." तसेच, काशीतील लोकांना मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरू शकतील अशा अनेक केंद्रीय योजनांचाही पंतप्रधान मोदींनी ऊहापोह केला.
पंतप्रधान मोदींनी लोकांना त्यांच्या अॅपमधील पक्षाच्या काही प्रेरणादायी सदस्यांचा उल्लेख असलेल्या कमल पुष्प या विभागात योगदान देण्याचे आवाहन केले. "नमो अॅपमध्ये असलेल्या 'कमल पुष्प' या अतिशय रोचक अशा विभागाच्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणादायी पक्ष कार्यकर्त्यांची माहिती शेअर करण्याची आणि ती जाणून घेण्याची संधी मिळते," असे ते म्हणाले. तसेच, इतरांकडून लहान योगदानाद्वारे निधी उभारण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सदस्यांना त्यांनी भाजपच्या विशेष सूक्ष्म देणगी मोहिमेमागची भूमिकाही सांगितली.