पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आयआयएससी बंगळुरू  येथे मेंदू संबंधी संशोधन केंद्राचे उद्‌घाटन केले आणि बागची पार्थसारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी केली.

पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले :

@iiscbangalore येथे मेंदू संबंधी संशोधन केंद्राचे उद्घाटन करताना आनंद झाला. या प्रकल्पाची पायाभरणी करण्याचा मानही मला मिळाला होता , त्यामुळे अधिक आनंद झाला आहे. मेंदूशी संबंधित विकारांचे व्यवस्थापन कसे करायचे यावर प्रामुख्याने   संशोधन केले जाईल. ”

“ज्या वेळी प्रत्येक राष्ट्राने आरोग्यसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, अशा वेळी बागची पार्थसारथी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयासारखे  प्रयत्न खूप महत्त्वाचे ठरतात.  आगामी काळात, यामुळे आरोग्य सेवा क्षमता अधिक मजबूत होईल आणि या क्षेत्रात अग्रगण्य संशोधनाला  प्रोत्साहन मिळेल. ”

मेंदूवरील संशोधन केंद्र हे एक प्रकारची विशिष्ट संशोधन सुविधा म्हणून विकसित केले असून  वयानुरूप होणाऱ्या मेंदूच्या  विकारांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरावा आधारित सार्वजनिक आरोग्य उपचार पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन करण्यावर भर देते.आयआयएससी बंगळुरू  संकुलात 832 खाटांचे बागची पार्थसारथी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे आणि प्रतिष्ठित संस्थेत विज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र अभ्यासक्रमांना एकत्र जोडण्यात मदत करेल. यामुळे देशात क्लिनिकल  संशोधनाला मोठी चालना मिळेल  आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याच्या दिशेने काम करेल ज्यामुळे देशातील आरोग्य सेवा सुधारण्यास मदत होईल.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world

Media Coverage

PM Modi hails diaspora in Kuwait, says India has potential to become skill capital of world
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi