महामहिम आणि मित्रांनो,
भाषण चालु करण्याआधी मी पोर्तुगाल सरकार आणि जनतेपर्यंत, माजी पंतप्रधान, माजी अध्यक्ष ,पोर्तुगालचे नेते आणि जगविख्यात व्याख्याते मेरो सोरेस यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सोरेस हे पोर्तुगाल आणि भारत यामधील राजकीय संबंध प्रस्थापित करणारे शिल्पकार होते. आम्ही पोर्तुगालच्या या दुःखद प्रसंगी त्यांच्या पाठीशी पूर्ण पाठिंब्याने उभे आहोत.
महामहिम, सुरिनामेचे उपाध्यक्ष मिस्टर मिखाईल अश्विन अधिन, पोर्तुगालचे महामहिम पंतप्रधान डॉक्टर अँटोनियो कोस्टा, श्री. वाजू भाई वाला, कर्नाटकचे राज्यपाल सिद्धरामैयाजी, कर्नाटकचे मुख्यमंत्री , मंत्रीगण, आणि येथे जमलेल्या भारतीय आणि विदेशी आमंत्रित,
१४ व्या भारतीय प्रवासी दिवसाप्रित्यर्थ तुमचे स्वागत करतांना मला खूप आनंद होत आहे. आज दूरवर प्रवास करून हजारोंच्या संख्येने आपण येथे सहभागी झालात तर लाखोंशी डिजिटलरित्या जोडले गेले आहोत.
खरं तर या दिवसाचे महत्व म्हणजे भारताचा अद्वितीय प्रवासी महात्मा गांधीजी हे याच दिवशी भारतात परत आले.
हे एक असे पर्व आहे जिथे आयोजक आपणच आहात आणि पाहुणे ही आपणच आहात. हे एक असे पर्व आहे जिथे विदेशात असलेल्या आपल्या मुलांना भेटण्याची संधी आहे. स्वजनांशी मिळणे , आपल्यासाठी नाही सर्वांसाठी भेटणे , या कार्यक्रमांची खरी ओळख – आन- बान- शान जे काही आहे ते तुम्ही आहात. आपली येथील उपस्थिती आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत.
बंगलोर सारख्या सुंदर शहरात आपण हा प्रवासी दिवस मनवतो आहोत. मी मुखमंत्री सिद्धरामय्याजी आणि त्यांच्या अख्ख्या चमूचे आभार मानतो की ज्यांनी हा दिवस यशस्वी होण्या साठी अथक परिश्रम घेतलेत.
हा क्षण माझ्यासाठी भाग्याचा आहे की, मला पोर्तुगालचे पंतप्रधान , सुरिनामेचे उपाध्यक्ष, मलेशिया आणि मॉरिशस चे मंत्रीगण यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली.
जागतिक पातळीवरील त्यांच्या समुदायात त्यांनी मिळवलेले यश हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीयांच्या यशस्वितेचे , उद्योजक वृत्तीचे पडसाद जगभर पडतील . ३० दशलक्षांहून भारतीय विदेशात राहतात. परंतु बहुसंख्येमुळे नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांची छाप पडत असते.
भारत आणि विदेशात राहणाऱ्या, त्यांच्या समुदायात विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल ते आदरणीय आहेत. विदेशातील भूमीत, जागतिक स्तरावरील त्यांच्या समुदायात भारतीयांनी स्वतःच्या संस्कृतीचे , तत्वांचे आणि मूल्यांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांची मेहनती वृत्ती , शिस्त, नियमांचे पालन आणि प्रेमळ स्वभाव या मुळे ते विदेशात रोड मॉडेल्स बनले आहेत.
आपल्या प्रेरणा जरी विविध असल्या तरी उद्देश एक आहे , मार्ग भिन्न आहेत, मंजिल वेगळी आहे परंतु आपल्या सर्वांमध्ये एकच भावविश्व आहे आणि तो भाव भारतीयत्वाचा आहे. प्रवासी भारतीय जिथे राहिलेत त्या धरतीला त्यांनी कर्म भूमी मानले आणि जिथून आलेत तिला मर्मभूमी मानले. आज तुम्ही सर्वानी त्या कर्मभूमीला बांधून आणून मर्मभूमीत प्रवेश केला आहे जिथे तुम्हाला , तुमच्या पूर्वजांना अविरत प्रेरणा मिळत आली आहे. प्रवासी भारतीय जिथे राहिले तिथला विकास त्यांनी केला आणि जिथले आहेत तिथे सुद्धा अवीट संबंध जोडून ठेवलेत, जितके शक्य आहे तितके योगदान दिले .
मित्रांनो,
वैयक्तिक माझ्यासाठी आणि माझ्या सरकारसाठी परदेशस्थ भारतीय समुदायाशी संलग्नता ही आमची प्राथमिकता आहे. माझ्या अमेरिका , ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका , कतार , सिंगापुर, फिजी, चीन , जपान, दक्षिण कोरिया, केनिया, मॉरिशस, मलेशिया इत्यादी देशांच्या भेटी दरम्यान हजारो भारतीयांपैकी शंभर बंधू- भगिनींना भेटण्याचा बोलण्याचा मला योग आला.
शाश्वत आणि पद्धतशीर कार्य प्रक्रियेमुळे परिणाम स्वरूप नवीन ऊर्जा , प्रबळ इच्छा शक्ती आणि बळकट धोरण भारतीय डायस्पोराने भारतीय सामाजिक आणि आर्थिक बदलासाठी विस्तारित रित्या संलग्न केले. परदेशस्थ भारतीयांतर्फे वार्षिक सहाशे नऊ बिलियन डॉलर चे योगदान भारतीय अर्थव्यवस्थेला मिळाले आहे.
प्रवासी भारतीयांमध्ये देशाच्या विकासासाठी अगम्य इच्छा शक्ती आहे. ते देशाच्या प्रगतीत सहयात्री आहेत. सहप्रवासी आहेत. आमच्या विकासात तुम्ही एक मौल्यवान साथीदार आहात. भागीदार आहात. भागधारक आहात. केव्हा तरी चर्चा व्हायची ब्रेन- ड्रेन . प्रत्येक जण प्रश्न विचारायचा ब्रेन- ड्रेन? आणि मी तेव्हां लोकांना सांगायचो .. ना तर मी तेव्हा मुख्यमंत्री होतो ना पंतप्रधान . तेंव्हा लोक म्हणायचे ब्रेन- ड्रेन होत आहे .. तेंव्हा मी म्हणायचो इथे काय बुद्दू लोक शिल्लक राहिलेत का? पण आज मी विश्वासाने सांगतो की आम्ही जी ब्रेन-ड्रेन ची चर्चा करत होतो , वर्तमान सरकारच्या प्राथमिकता ब्रेन – ड्रेन मधून ब्रेन- गेन मिळवण्यासाठी आहेत. आमची ब्रेन- ड्रेन ला ब्रेन गेन मध्ये बदलण्याची इच्छा आहे. आणि हे सर्व आपल्या सहभागमुळे शक्य आहे. हा माझा विश्वास आहे.
आपल्या निवडक क्षेत्रात अनिवासी भारतीयांनी आणि पी आई ओ’ ने अद्वितीय योगदान दिले आहे. यामध्ये राजकीय नेते, शास्त्रज्ञ , प्रथित यश डॉक्टर्स , बुद्धिवंत शिक्षण तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, संगीतकार, पत्रकार, बँकर्स, इंजिनिर्स , आणि विधिज्ञ यांचा समावेश आहे. आणि सॉरी , मी लोकप्रिय माहिती तंत्रज्ञान व्यवसायिकांचे नाव घेतले का ? उद्या ३० हजार परदेशी भारतीयांना देशी -विदेशातील त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित ‘भारतीय सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल .
मित्रांनो ,
त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि व्यवसाय यांच्या पुढे जाऊन त्यांचे विदेशात कल्याण आणि सुरक्षेसाठी आम्ही प्राथमिकता देत आहोत. यासाठी आमच्या संपूर्ण प्रशासकीय इको पध्दतीला आम्ही बळकट करत आहोत. मग ते पासपोर्ट हरविल्याची तक्रार असो, कायदेशीर सल्ल्याची आवश्यकता असो , वैद्यकीय सहाय्य असो , निवारा किंवा भारतात परत येण्यासाठी वाहतूक व्यवस्था असो , मी प्रत्येक विदेशी दूतावासांना निर्देश देऊन ठेवलेत की, विदेशी भारतीय नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतर्क राहा.
विदेशी भारतीयांच्या गरजांना आमचा प्रतिसाद म्हणजे संवेदनशीलता, तत्परता, गतिशीलता आणि भारतीय दूतावासाकडून २४ X ७ मदत कार्य मार्गिका , ओपन हाऊस सभांचे आयोजन, सल्लागार सभा , पासपोर्टसाठी ट्विटर सेवा आणि तात्काळ संलग्नतेसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असे काही मापदंड आम्हाला राबवावे लागतील ज्यामुळे प्रवासी भारतीयांपर्यंत निखळ संदेश पोहोचू शकेल की, तुमची जेंव्हा गरज असेल तेंव्हा आम्ही तुमच्या सोबत आहोत.
विदेशातील भारतीय राष्ट्रयित्व असलेल्याचे महत्व आम्हाला असून आम्ही पासपोर्टचा कलर बघत नाही तर रक्ताची नाती जास्त महत्वाची मानतो. भारतीय राष्ट्रीयत्त्व असलेल्यांना, आम्ही त्यांची सुरक्षा, त्यांची वापसी, त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही सतत त्यांच्या पर्यंत पोहचू. आमच्या विदेशी व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या स्वतः परदेशस्थ भारतीयांच्या समस्यांबाबत तत्पर आणि सोशल मीडिया वर कृतिशील असतात.
जुलै २०१६ मधे ‘संकट मोचन’ ऑपेरशन अंतर्गत , १५० भारतीयांना दक्षिण सुदानमधून केवळ ४८ तासात सुखरूप बाहेर काढले यापूर्वी सुद्धा हज़ारो आपल्या नागरिकांना येमेन येथील क्लिष्ठ परिस्थितीतून योग्य समन्वयन , हळुवार सहकार्यद्वारे बाहेर काढले आहे. आणि गेल्या दोन वर्षात २०१४ आणि २०१६ मधे आम्ही ९० हज़ार भारतीयांना ५४ देशांमधून सुरक्षित मायदेशी आणले आहे.
भारतीय समुदाय कल्याण निधिद्वारे आणि आकस्मिक निधीतुन, आम्ही ऐंशी हजारांपेक्षा जास्त भारतीयांना मदत केली आहे. आमचे असे उदिष्ट आहे की, प्रत्येक विदेशी भारतीयाला स्वतःचे घर दूर वाटायला नको. आम्ही जेव्हा छोटे होतो तेंव्हा ऐकत होतो, मामाचे घर किती दूर तर तेंव्हा सांगितले जायचे , जो पर्यन्त दिवा तेवत राहिल इतके दूर त्याला एवढी निकटता जाणवली पाहिजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहत असू दे , त्याला हे आपलेपण जाणवायला हवे. असे कामगार जे विदेशात आर्थिक संधी शोधतात आमचे त्यांना एकच सांगणे , ” सुरक्षित जा , प्रशिक्षित होऊन जा आणि विश्वासाने जा ” यासाठी आम्ही आमची पध्दत मध्यवर्ती केली असून जे कामगार स्थलांतर करणार आहेत त्यांच्या साठी काही मापदंड अवलंबिले आहेत. जवळपास सहा लाख अभियांत्रिकाना नोंदणीकृत भर्ती अभिकर्त्यांद्वारे स्थलांतरासाठीची ऑनलाईन मंजूरी मिळाली आहे. इ-माइग्रेट पोर्टलवर विदेशी कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी नियमित करण्यात आली आहे.
जर स्थलांतरित कामगारांची गाऱ्हाणी , कायदेशीर तक्रारी निरन्तरपणे इ- माइग्रेट किंवा एम् ए डी ऐ डी द्वारे ऑनलाईन मिळत असतील तर आम्ही सुद्धा कायदेशीर भर्ती अभिकर्त्यांच्या विरुध्द कारवाई करायला तयार आहोत.
केंद्रीय अन्वेषण ब्यूरो आणि राज्य पोलिस यांच्याद्वारे बेकायदेशीर अभिकर्त्यां विरुध्द तसेच भर्ती अभिकर्त्याद्वारे जमा केलेल्या रुपये २० लाख ते ५० लाख पर्यंतची बँक गॅरेंटी वाढली असेल तर आम्ही काही पाऊले या दिशेनी टाकली आहेत. स्थलांतरित भारतीय कामगारांना आर्थिक चांगल्या संधि उपलब्ध व्हाव्यात म्हणून आम्ही अलीकडेच एक छोटा कौशल्य विकास कार्यक्रम “प्रवासी कौशल विकास योजना” चालू केली असून याद्वारे भारतीय युवकांना परदेशात रोजगार मिळेल.
भारतातून जाणाऱ्या लोकांनी मूल्याधिष्ठित अवस्थेत जावे ज्यामुळे एक नविन विश्वास निर्माण होईल. यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत यामुळे गरीब, छोटी कामे करणाऱ्या लोकांचे विदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी त्यांना त्या त्या देशाचे रीतिरिवाज़ , संस्कृति शिकणे जरुरी आहे. जरी ते उच्च विद्या विभूषित असले तरी त्यांना या सर्व शिकलेल्या बाबी कामी पडतील या वरही आम्ही जोर देत आहोत. ज्याला आम्ही “सॉफ्ट स्किल” म्हणतो.
तर अशा व्यवस्था ज्यामुळे भारतातील व्यक्ति जगात कुठेही पाऊल ठेवल्यास त्याला परकेपणा जाणवायला नको. इतरांना ही तो आपला वाटायला हवा अणि त्यांचा आत्मविश्वास या ऊंचीला पार करणारा असायला हवा. जसे ते वर्षां पासून त्या भूमिला ओळखतात तेथील लोकांना जाणतात ते त्वरित स्वतःला प्रस्थापित करू शकतात.
मित्रहो ,
आमच्याकडे भारतीय डायस्पोराच्या विशेष प्रतिभूति धारक आहेत ज्या गिरमिटिया देशांमधे राहात असून जे आपल्या मूळ देशांशी भावनिक आणि खोलवर जोडलेले आहेत. आम्हाला कल्पना आहे की, मूळ भारतीयांना कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत असेल जे चार किंवा पाच पिढ्यांपूर्वी स्थलांतरित जाले आहेत आणि ज्यांनी ओ सी आई कार्ड धारण केले आहे. आम्ही त्यांना या समस्यांच्या निराकारणासाठी पोहोच दिली असून प्रयत्न चालू आहेत.
मॉरीशस बरोबर भागीदारी वाढविण्याच्या घोषणेने मला अत्यंत आंनद झाला आहे. यासाठी आम्ही नविन प्रक्रिया , कागदपत्रांची पूर्तता यावर काम करीत आहोत जेणेकरून गिरमिटिया देशांचे नागरिक ओसीआई कार्ड साठी पात्र राहतील. फिजी , सूरीनाम, ग्याना, अणि इतर कॅरीबीयन राज्यांमधील पी.आई. ओ च्या समान समस्यांना आम्ही जाणले आहे.
मी गेल्या प्रवासी भारतीय दिवसा प्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात विनंति केली होती आणि आत्ता ही सर्व पी आई ओ कार्ड होल्डर्स ला सांगतो की, तुम्ही तुमचे पी आई ओ कार्ड चे रूपांतर ओ सी आई कार्ड मध्ये करून घ्या। मी बोलत राहतो, आग्रह ही करतो परंतु मला माहित आहे की तुम्ही खुप व्यस्त आहात. म्हणूनच हे काम राहून जाते. तुमच्या या व्यस्ततेला बघुन मला घोषणा करायला आंनद होत आहे की, आम्ही या परिवर्तनाची अंतिम तिथि कुठल्याही दंडाविना डिसेंबर ३१, २०१६ वरुन वाढवून ३० जून २०१७ केली आहे. या वर्षीच्या जानेवारी अखेर पर्यन्त ओसीडी धारकांसाठी दिल्ली आणि बंगलुरुच्या विमानतळा पासून सुरवात करून स्थलांतरित केन्द्राच्या तिथे विशेष कक्ष स्थापन करणार आहोत.
मित्रांनो,
आज जवळपास सात लाख भारतीय विद्यार्थी विदेशात शैक्षणिक कार्यक्रम घेत आहेत. आणि मला चांगले माहिती आहे की विदेशात राहणारा प्रत्येक भारतीय , भारताच्या विकासासाठी आतुर आहे. त्यांचे ज्ञान, विज्ञान अणि भारताच्या ज्ञानाचे भंडार , भारताला असीम उंचीवर नेईल.माझा सदैव असा प्रयत्न आणि विश्वास राहिला आहे की सक्षम तसेच यशस्वी प्रवाश्यांसाठी भारताची विकास गाथा जोडण्यासाठी संपूर्ण संधी मिळायला विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत. यापैकी एक म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग “संलग्न संयुक्त संशोधन” समूह अर्थात ”वज्र” ( व्हीए.जे.आर.ऐ) कार्यरत करीत असून ज्यामुळे अनिवासी भारतीयांना आणि विदेशी संशोधन समुदायला भारताच्या संशोधन आणि विकासात सहभागी होता येईल तसेच योगदान देता येईल. या योजने अन्तर्गत , विदेशी भारतीय भारतातील संस्थेत एक किंवा तीन महिन्यांपर्यन्त काम करू शकतील. ज्यामुळे प्रवासी भारतीय भारताच्या प्रगतीचा एक हिस्सा बनतील.
मित्रांनो,
माझा असा पक्का विश्वास आहे की, भारतीय आणि विदेशी भारतीय शाश्वत आणि चांगल्या विकासासाठी संलग्नित राहावे. हे उदिष्ट साध्य करण्यासाठी गेल्या ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधींच्या जयंती प्रित्यर्थ नवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय दिनाचे नवी दिल्ली येथील प्रवासी भारतीय केंद्राचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले हे केंद्र अनिवासी भारतीय समुदायाला अर्पण केले आहे. आम्हाला हे केंद्र जागतिक स्थलांतर, अनुभव, विकास आणि भारतीय डायस्पोरा साठी बंधनकारक हवे आहे. मला विश्वास आहे की, सरकारच्या विदेशी भारतीय समुदायाला आकार देण्याच्या विविध प्रयत्नांना आणि सर्व विदेशी भारतीयांना पुन्हा ओळख देण्यासाठी हे केंद्र एक व्यासपीठ म्हणुन महत्वाचे काम करेल.
मित्रहो,
आमचे प्रवासी भारतीय कित्येक पिढ्यांपासून विदेशात राहतात. प्रत्येक पिढयांच्या अनुभवाने भारताला अधिक सक्षम केले आहे. जसे नवीन रोपट्याबाबत एक अकल्पिक स्नेह निर्माण होतो. त्याच प्रमाणे विदेशात राहणारा तरुण प्रवासी भारतीय आमच्यासाठी अनमोल आहे, विशेष आहे. आम्ही प्रवासी भारतीयांच्या युवा पिढीशी मजबूत, घनिष्ट संबंध ठेऊ इच्छितो
तरुण मूळ भारतीय युवक जे विदेशात स्थायिक होण्याच्या प्रयत्नात आहे अशांना त्यांच्या जन्मभूमीला भेट देण्याची , त्यांना त्यांच्या संस्कृतीला, वंशजांना पुन्हा जोडण्याची तरतूद भारतीय युवक करतील. यासाठी सरकारच्या ‘ नो इंडिया कार्यक्रमांतर्गत, सहा समूह पहिल्यांदाच भारताला भेट देण्यासाठी येत आहेत.
मला हे ऐकून आनंद झाला की १६० विदेशी भारतीय या प्रवासी दिवस कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. तरुण प्रवासी भारतीयांचे विशेष स्वागत . मला आशा आहे की, तुम्ही तुमच्या प्रातिनिधिक देशांना परतल्यानंतर तुम्ही पुन्हा आमच्याशी संलग्न राहाल.आणि पुन्हा पुन्हा भारताला भेट द्याल. गेल्या वर्षी अनिवासी भारतीयांसाठी आयोजित, “भारताला जाणा” या क्विझ स्पर्धेमधे ५००० तरुण अनिवासी भारतीयांनी आणि पी आई ओ’ ज ने भाग घेतला होता.
या वर्षीच्या दुसऱ्या सत्रात जवळपास ५०००० अनिवासी भारतीय सहभागी होतील अशी मला आशा आहे. तरुण मित्रांनो, तुम्ही मला या अभियानात मदत कराल का? तुम्ही माझ्याबरोबर काम करायला तयार आहेत का? मग आपण ५० हजारांवरच का थांबायचे?
मित्रांनो,
आज भारत एक नव्या प्रगतिशील दिशेकडे अग्रेसर आहे. अशी प्रगती जी ना केवळ आर्थिक आहे सामाजिक, राजकीय आणि शासकीय सुद्धा आहे. आर्थिक क्षेत्रात पी आई ओ’ज साठी प्रत्यक्ष गुंतवणूक पूर्णपणे उदार केली आहे. एफ डी आई ची माझ्या दोन परिभाषा आहेत. एक म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे विदेशी प्रत्य्क्ष गुंतवणूक आणि दुसरे म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया म्हणजे आधी भारताचा विकास.
पी आई ओ ‘ज कडील गुंतवणूक ही “अ-परतावा तत्वावर” असून या मध्ये त्यांनी संस्था , विश्वस्त तसेच भागीदारी स्वतःच्या मालकीकडे घेतली असते, ती आता देशांतर्गत गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीसारखी समजली जाईल. स्वच्छ भारत , डिजिटल भारत अभियान , स्टार्ट अप इंडिया असे अनेक कार्यक्रम आहेत ज्यामध्ये प्रवासी भारतीय भारताच्या सामान्य व्यक्तीच्या प्रगतीशी जोडला जातो. या पैकी काही तुम्ही सुद्धा असाल जे व्यवसाय किंवा गुंतवणुकीत आपला सहभाग देऊ शकतात तर इतर अशा अनेक क्षेत्रातील अभियानांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे योगदान देऊ शकतील.
मी आपल्या भारताची भागीदारी मजबूत करण्याच्या प्रयत्नांचे स्वागत करतो. मी प्रवासी भारतीय परिषदेत आपले स्वागत करतो जी तुम्हाला आमच्या फ्लॅगशिप कार्यक्रमाबाबतचा एक दृष्टिकोन देईल ज्याची आम्ही अंमलबजावणी करू. बघा तुम्ही कसे भागीदार होऊ शकता. तर काही जणांना वाटत असेल की आपला अमूल्य वेळ अन प्रयत्न भारतातील अनेक गरीब लोकांच्या विकास कार्यात कार्यकर्ता म्हणून घालवावा.
मित्रांनो ,
इथे आल्यानंतर आपण ऐकले असेल , बघितले असेल की आम्ही भ्रष्टाचार विरोधात , काळ्या पैश्या विरोधात एक खूप मोठा विडा उचलला आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार आमच्या राजनीतीला, देशाला, समाजाला तसेच शासनाला हळू हळू पोखरून काढत होते. आणि ही दुर्देवाची बाब आहे की काळ्या पैशांचे काही राजनैतिक पुजारी आमच्या प्रयत्नांना जनतेच्या समक्ष विरुद्ध रूपात मांडत होते. भ्रष्टाचार आणि काळा पैसा समाप्त करण्यासाठी तुम्ही भारत सरकारच्या नितींना जे समर्थन केले त्यासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. धन्यवाद देतो.
मित्रांनो,
मला सरते शेवट असे म्हणायचे आहे की, भारतीय म्हणून आपली एक संस्कृती आहे जिने आपल्याला एकत्र आणले. आपण जगात कुठे राहतो यांनी फरक पडत नाही आपण भारतीय वंशज आहोत हा एकच मुद्दा आपल्यातील संबंध बळकट करतो. आणि या साठी माझ्या प्रिया देशवासियांनो, आपण जे स्वप्न उराशी बाळगले आहे , आपले स्वप्न आमचे संकल्प आहेत. हि स्वप्ने साकार करण्यासाठी व्यवस्थेत बदल जरुरी आहे. जर कायदेशीर नियमात बदल आवश्यक असतील तर, साहसी कदम उठवण्याची आवश्यकता असली तरी, प्रत्येकाला बरोबर घेऊन चालण्या साठी जे काही करावे लागेल यासाठी आम्ही तयार आहोत. २१ वे शतक भारताचे आहे. खूप खूप धन्यवाद.
आभारी आहे. जय हिंद !
PM begins address, condoles death of Mario Soares, architect of the re-establishment of diplomatic relations btw India and Portugal #PBD2017 pic.twitter.com/IpMGiULJEh
— Vikas Swarup (@MEAIndia) January 8, 2017
It is a great pleasure for me to welcome all of you on this 14th Pravasi Bharatiya Diwas: PM @narendramodi #PBD2017 @PBDConvention
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
Indians abroad are valued not just for their strength in numbers. They are respected for the contributions they make: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
The Indian diaspora represents the best of Indian culture, ethos and values: PM @narendramodi #PBD2017 @PBDConvention
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
Engagement with the overseas Indian community has been a key area of priority: PM @narendramodi @PBDConvention #PBD2017
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
Remittance of close to sixty nine billion dollars annually by overseas Indians makes an invaluable contribution to the Indian economy: PM
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
NRIs and PIOs have made outstanding contributions to their chosen fields: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
The welfare and safety of all Indians abroad is our top priority: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
The security of Indian nationals abroad is of utmost importance to us: PM @narendramodi @PBDConvention #PBD2017
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
EAM @SushmaSwaraj has particularly been proactive and prompt in reaching out to distressed Indians abroad using social media: PM at #PBD2017
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
For those workers who seek economic opportunities abroad, our effort is to provide maximum facilitation and ensure least inconvenience: PM
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
I would again encourage all PIO Card holders to convert their PIO Cards to OCI Cards: PM @narendramodi @PBDConvention #PBD2017
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
PM: We will shortly launch a skill devt program - the Pravasi Kaushal Vikas Yojana - targeted at Indian youth seeking overseas employment pic.twitter.com/4VJbL4CWE2
— Vikas Swarup (@MEAIndia) January 8, 2017
PM: Starting w/ Mauritius, we are working to put in place procedures so that descendants of Girmitiyas could become eligible for OCI Cards pic.twitter.com/wGng9BjFj9
— Vikas Swarup (@MEAIndia) January 8, 2017
PM: We remain committed to addressing similar difficulties of PIOs in Fiji, Reunion Islands, Suriname, Guyana and other Caribbean States. pic.twitter.com/KTd9yYKQEv
— Vikas Swarup (@MEAIndia) January 8, 2017
We welcome all your efforts that seek to strengthen India’s partnership with the overseas Indian community: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 8, 2017
PM: We have extended the deadline for PIO card conversions to OCI from 31 December 2016, until June 30, 2017 without any penalty.
— Vikas Swarup (@MEAIndia) January 8, 2017
PM: From1st of January this year, beginning with Delhi & Bengaluru, we have set up special counters at immig'n points for OCI cardholders
— Vikas Swarup (@MEAIndia) January 8, 2017
PM speaks of how overseas Indians in the scientific field can share their knowledge and expertise through programmes like VAJRA schemes pic.twitter.com/slIa8rnZcF
— Vikas Swarup (@MEAIndia) January 8, 2017
PM on the Pravasi Bharatiya Kendra: We want it to become a symbol of global migration, achievements & aspirations of the Diaspora.
— Vikas Swarup (@MEAIndia) January 8, 2017
PM: A special welcome to the young Pravasis – I hope that on returning to your respective countries, you will remain connected with us pic.twitter.com/QeESshH9qm
— Vikas Swarup (@MEAIndia) January 8, 2017
PM concludes: Whether knowledge, time or money, we welcome your contribut'ns that strengthen India’s partnership w/ overseas community pic.twitter.com/eibfXZYbZD
— Vikas Swarup (@MEAIndia) January 8, 2017