पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार पटेल प्राणीसंग्रहालयाचे आणि जिओडेसिक आयव्हरी पद्धतीच्या घुमटाचे उद्घाटन केले. त्यांनी केवडिया एकात्मिक विकास अंतर्गत, 17 प्रकल्प देशाला समर्पित केले आणि 4 नवीन प्रकल्पांसाठी पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये जलपर्यटन मार्ग, न्यू गोरा ब्रिज, गरुडेश्वर बंधारा, सरकारी निवासस्थाने, बस बे टर्मिनस, एकता नर्सरी, खलवानी इको टूरिझम (पर्यावरणीय पर्यटन), आदिवासी होम स्टे यांचा समावेश आहे. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला एकता सागरी पर्यटन जहाज सेवेचा झेंडा दाखविला.
The Fly High Indian Aviary would be a treat for those interested in birdwatching. Come to Kevadia and visit this aviary, which is a part of the Jungle Safari Complex. It will be a great learning experience. pic.twitter.com/RiZjDTcfOx
— PMO India (@PMOIndia) October 30, 2020
जंगल सफारी आणि जिओडेस्टिक आयव्हरी डोम
पंतप्रधान म्हणाले, “फ्लाय हाय इंडियन आयव्हरी ही पक्षी निरीक्षणाची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी असेल. केवडिया येथे या आणि या आयव्हरीला भेट द्या, जे जंगल सफारी परिसराचा एक भाग आहे. हा चांगला शिकण्याचा अनुभव असेल.”
राज्यात जंगल सफारी हे 375 एकर परिसरामध्ये 29 ते 180 मीटर पर्यंतच्या सात वेगवेगळ्या स्तरावर पसरलेले प्राणी उद्यान आहे. यैंधेयो 1100 पेक्षा अधिक पक्षी आणि प्राणी आणि 5 लाख झाडे आहेत. हे सर्वाधिक वेगाने उभारले गेलेले जंगल सफारी आहे. प्राणीसंग्रहालयामध्ये दोन मोठे पिंजरे आहेत– एक स्थानिक पक्ष्यांसाठी आणि दुसरा परदेशी पक्ष्यांसाठी. हा जगातील सर्वांत मोठा जिओडेसिक पद्धतीचा पिंजऱ्यावरील घुमट आहे. मकाऊ, काकाकुवा, ससे, गिनीपिग अशा प्राण्यांना स्पर्श करून, त्यांचा आनंददायक अनुभव घेण्याची अनोखी संधी या पिंजऱ्यांमधून मिळणार आहे.
एकता सागरी पर्यटन सेवा
एकता क्रूझ सेवेच्या माध्यमातून 6 किलोमीटर अंतर पार करून श्रेष्ठ भारत भवन ते स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत फेरी बोट सेवेच्या मआध्यमातून स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्याचा अनुभव घेता येईल. 40 मिनिटांची ही फेरी बोट 200 प्रवाशांना एका वेळी घेऊन जाऊ शकते. या फेरीच्या व्यवस्थापनाच्या सेवेसाठी न्यू गोरा ब्रिज हा विशेषत्वाने बांधण्यात आला आहे. जे पर्यटक स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्यासाठी येतील, त्यांच्यासाठी बोट विहाराचा आनंद घेता यावा, यासाठी जल पर्यटनाचा मार्ग देखील तयार करण्यात आला आहे.