Quote“नालंदा हे भारताच्या शैक्षणिक वारशाचे आणि सक्रीय सांस्कृतिक विनिमयाचे प्रतीक आहे”
Quote“नालंदा हे केवळ नाव नाही. नालंदा ही एक ओळख आहे, एक सन्मान आहे, एक मूल्य, एक मंत्र, एक अभिमान आणि एक गाथा आहे”
Quote“या पुनरुज्जीवनाद्वारे भारतातील सुवर्णयुगाचा प्रारंभ होत आहे”
Quote“नालंदा हे भारताच्या इतिहासाचे केवळ पुनरुज्जीवन नाही.जगातील अनेक देश आणि आशियाचा वारसा त्याच्याशी संलग्न आहे”
Quote“भारत अनेक शतके एक आदर्श म्हणून वाटचाल करत राहिला आणि शाश्वततेचे दर्शन घडवले.आम्ही प्रगती आणि पर्यावरणाला सोबत घेऊन पुढे जातो”
Quote“भारत जगासाठी शिक्षण आणि ज्ञानाचे केंद्र बनावा हे माझे मिशन आहे.जगातील सर्वात महत्त्वाचे ज्ञान केंद्र म्हणून भारताची जगात ओळख निर्माण व्हावी हे माझे मिशन आहे”
Quote“भारतामध्ये जगातील सर्वात जास्त समावेशक आणि परिपूर्ण कौशल्य प्रणाली आणि भारतात सर्वात आधुनिक संशोधन आधारित शिक्षण प्रणाली असावी हा आमचा प्रयत्न आहे”
Quote“नालंदा हे जागतिक गरजांची पूर्तता करणारे एक महत्त्वाचे केंद्र बनेल असा मला विश्वास आहे”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्‌घाटन केले. भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद (ईएएस) देशांमधील सहकार्य म्हणून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. 17 देशांच्या मिशन प्रमुखांसह अनेक मान्यवर या उद्‌घाटन समारंभाला उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी एक रोपटेही लावण्यात आले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्याच्या 10 दिवसांत नालंदाला भेट द्यायला मिळणे हे आपले भाग्य असल्याचे सांगत आभार मानले. भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी हे सकारात्मक संकेत आहेत, असे ते म्हणाले. “नालंदा हे फक्त एक नाव नाही, ती एक ओळख आहे, एक सन्मान आहे. नालंदा हे मूळ आहे, मंत्र आहे. पुस्तके आगीत जळली तरी ज्ञानाचा नाश होऊ शकत नाही या वस्तुस्थितीची नालंदा ही घोषणा आहे,” असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. नवीन नालंदा विद्यापीठाच्या स्थापनेमुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होईल,असे त्यांनी अधोरेखित केले.

 

|

नालंदाचे तिच्या प्राचीन भग्नावशेषांच्या जवळ पुनरुज्जीवन केल्यामुळे जगाला भारताच्या क्षमतेची ओळख होईल कारण ती जगाला हे सांगेल की भक्कम मानवी मूल्ये असलेल्या देशांमध्ये आपल्या इतिहासाचे पुनरुज्जीवन करून एका चांगल्या जगाची निर्मिती करण्याची क्षमता असते, असे पंतप्रधान म्हणाले.

नालंदा जगाचा, आशियाचा आणि अनेक देशांचा वारसा आपल्यासोबत वाहात आहे आणि त्याचे पुनरुज्जीवन हे केवळ भारतीय पैलूंच्या पुनरुज्जीवनापुरते मर्यादित नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. आजच्या उद्‌घाटन सोहळ्याला अनेक देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीतून हे सिद्ध होत आहे असे त्यांनी नालंदा प्रकल्पामध्ये मित्र देशांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत सांगितले. त्यांनी बिहारच्या जनतेची देखील नालंदामध्ये प्रतिबिंबित होत असलेले आपले वैभव परत आणण्याच्या निर्धाराबद्दल प्रशंसा केली.

नालंदा हे एकेकाळी भारताची संस्कृती आणि परंपरा यांचे जिवंत केंद्र होते याकडे निर्देश करत पंतप्रधान म्हणाले की नालंदाचा अर्थ आहे ज्ञान आणि शिक्षण यांचा सतत वाहात राहणारा प्रवाह आणि हा भारताचा शिक्षणाविषयीचा दृष्टीकोन आणि विचार आहे.    

"शिक्षण हे सीमांच्या पलीकडे आहे. त्याला आकार देताना ते मूल्ये आणि विचार बिंबवत असते.”, पंतप्रधान म्हणाले की, प्राचीन नालंदा विद्यापीठात विद्यार्थ्यांना त्यांची ओळख आणि राष्ट्रीयत्व विचारात न घेता प्रवेश दिला जात होता.  नव्याने उदघाटन झालेल्या आधुनिक स्वरुपातील नालंदा विद्यापीठाच्या संकुलात त्याच प्राचीन परंपरांना बळकटी देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. नालंदा विद्यापीठात 20 हून अधिक देशांतील विद्यार्थी आधीपासूनच शिकत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि हे ‘वसुधैव कुटुंबकम’ चे उत्तम उदाहरण असल्याचे सांगितले.

 

|

शिक्षणाला मानव कल्याणाचे साधन मानण्याची भारतीय परंपरा पंतप्रधानांनी अधोरेखित केली. त्यांनी आगामी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उल्लेख करून योग दिन हा आंतरराष्ट्रीय सण बनल्याचे सांगितले. ते म्हणाले की योगसाधनेचे अनेक प्रकार विकसित करूनही, भारतात कोणीही या साधनेवर मक्तेदारी सांगितली नाही. तशाच प्रकारे भारताने आयुर्वेदाची माहिती संपूर्ण जगासोबत सामाईक केली, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी भारताची शाश्वततेची भक्ती अधोरेखित केली आणि सांगितले की, भारतात आम्ही प्रगती आणि पर्यावरण एकत्र आणले आहे.यामुळे भारताला मिशन लाइफ आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स सारखे उपक्रम देता आले. ते म्हणाले की, नेट झिरो एनर्जी, नेट झिरो एमिशन, नेट झिरो वॉटर आणि नेट झिरो वेस्ट मॉडेलसह नालंदा संकुल शाश्वततेची भावना पुढे नेईल.

शिक्षणाच्या विकासामुळे अर्थव्यवस्था आणि संस्कृतीची मुळे अधिक खोलवर रुजतात यावर पंतप्रधानांनी भर दिला. जागतिक अनुभवातून आणि विकसित देशांच्या अनुभवातून हे सिद्ध झाले आहे.“2047 पर्यंत विकसित देश बनण्याच्या लक्ष्याच्या दिशेने काम करणारा भारत आपल्या शिक्षण प्रणालीत परिवर्तन करत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.“भारत हे जगासाठी शिक्षण आणि ज्ञानाचे केंद्र बनणे हे माझे मिशन आहे. माझे मिशन हे आहे की भारत पुन्हा जगातील सर्वात प्रमुख ज्ञान केंद्र म्हणून ओळखला जावा.” एक कोटीहून अधिक मुलांना शिक्षण देणाऱ्या अटल टिंकरिंग लॅब्स , चांद्रयान आणि गगनयान द्वारे निर्माण होणारी विज्ञानाची आवड आणि 10 वर्षांपूर्वी केवळ काही शेकडा असलेल्या स्टार्टअपची  संख्या 1.30 लाखांवर नेणारे स्टार्ट अप इंडियासारखे उपक्रम, विक्रमी संख्येने दाखल होणारे पेटंट आणि संशोधन प्रबंध आणि एक लाख कोटी संशोधन निधी याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

 

|

जगातील सर्वात प्रगत संशोधन-केंद्रित उच्च शिक्षण प्रणाली  सोबतच सर्वात व्यापक आणि संपूर्ण कौशल्य प्रणाली तयार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.  जागतिक क्रमवारीत भारतातील विद्यापीठांच्या सुधारित कामगिरीचाही त्यांनी उल्लेख केला.  गेल्या 10 वर्षात शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात भारताच्या अलीकडील कामगिरीवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी QS रँकिंगमध्ये भारतीय शैक्षणिक संस्थांची संख्या 9 वरून 46 वर, तर  टाइम्स हायर एज्युकेशन इम्पॅक्ट रँकिंगमध्ये 13 वरुन 100 वर पोहचल्याचा उल्लेख केला. भारतात गेल्या 10 वर्षांत दर आठवड्याला एक विद्यापीठ स्थापन केले गेले आहे, दररोज एक नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली आहे, दर तिसऱ्या दिवशी एक अटल टिंकरिंग लॅब उघडण्यात आली आहे आणि दररोज दोन नवीन महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतात आज 23  भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आहेत, आज भारतीय व्यवस्थापन संस्थांची (IIM) संख्या 13 वरून 21 वर पोहोचली आहे आणि एम्स (AIIMs) ची संख्या जवळपास तीन पटीने वाढून 22 वर पोहोचली आहे, असेही त्यांनी सांगितले.“गेल्या 10 वर्षात देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या देखील जवळपास दुप्पट झाली आहे.", असे ते म्हणाले.  शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांबाबत बोलताना, पंतप्रधानांनी नवीन शैक्षणिक धोरणाचा उल्लेख केला आणि या नव्या धोरणामुळे भारतीय तरुणांच्या स्वप्नांना एक नवीन आयाम मिळाल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय आणि परदेशी विद्यापीठांच्या सहकार्याचा तसेच डीकिन आणि वोलोंगॉन्ग सारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे देशात नवीन कॅम्पस स्थापित केले जाण्याचा उल्लेख केला.“या सर्व प्रयत्नांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भारतातच सर्वोत्तम शैक्षणिक संस्था उपलब्ध झाल्या आहेत.  यामुळे आपल्या मध्यमवर्गीयांच्या पैशांची बचत होत आहे,” असेही पंतप्रधानांनी पुढे सांगितले.

नुकत्याच सुरू झालेल्या प्रमुख भारतीय संस्थांच्या जागतिक कॅम्पसचा उल्लेख करून पंतप्रधानांनी नालंदा विद्यापीठाबाबतही असेच घडण्याची आशा व्यक्त केली.

 

|

जगाच्या नजरा भारतीय तरुणांवर खिळल्या आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “भारत हा भगवान बुद्धांचा देश आहे आणि जगाला लोकशाहीची जननी असलेल्या भारताबरोबर खांद्याला खांदा लावून चालण्याची इच्छा आहे”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले. “जेव्हा भारत 'एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य' म्हणतो तेव्हा जग भारताबरोबर उभे राहते. भारत जेव्हा ‘एक सूर्य, एक जग, एक ग्रिड’ म्हणतो तेव्हा तो जगाच्या भविष्याचा मार्ग मानला जातो.  जेव्हा भारत ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ म्हणतो तेव्हा जग त्यांच्या विचारांचा आदर करते आणि या विचारांचा स्वीकारही करते.“नालंदाची भूमी विश्वबंधुत्वाच्या या भावनेला नवा आयाम देऊ शकते.त्यामुळे नालंदा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर आणखी मोठी जबाबदारी आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

नालंदा विद्यापीठाचे विद्यार्थी आणि विद्वान हे भारताचे भविष्य असल्याचे सांगून पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या अमृत काळाच्या पुढील 25 वर्षांचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांना ‘नालंदा विद्यापीठाचा वैचारिक मार्ग’ आणि ‘नालंदा विद्यापीठाची मूल्ये’ सोबत घेऊन जाण्याचे आवाहन केले.या विद्यार्थ्यांनी जिज्ञासू, धैर्यवान  आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाच्या बोधचिन्हानुसार दयाळू बनून समाजात सकारात्मक बदलासाठी काम करावे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

 

|

नालंदा विद्यापीठाचे ज्ञान मानवतेला दिशा देईल आणि आगामी काळात हे ज्ञान प्राप्त झालेले तरुण संपूर्ण जगाचे नेतृत्व करतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.  "मला विश्वास आहे की नालंदा विद्यापीठ  जागतिक कल्याणासाठी काम करणारे एक महत्त्वाचे केंद्र बनेल", असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

बिहारचे राज्यपाल  राजेंद्र आर्लेकर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ सुब्रह्मण्यम जयशंकर, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा आणि  सम्राट चौधरी,नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अरविंद पनगरिया आणि नालंदा विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. अभय कुमार सिंग यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

|

पार्श्वभूमी

नालंदा विद्यापीठ प्रांगणात दोन शैक्षणिक ब्लॉक असून यातील 40 वर्गखोल्यांची एकूण आसन क्षमता सुमारे 1900 इतकी आहे. यामध्ये प्रत्येकी 300 आसन क्षमता असलेले दोन सभागृहे आहेत.येथे सुमारे 550 विद्यार्थी क्षमता असलेले विद्यार्थी वसतिगृह आहे.  या प्रांगणात आंतरराष्ट्रीय केंद्र, सुमारे 2000 लोकांना सामावून घेणारे ॲम्फी थिएटर, फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासह इतर विविध सुविधा उपलब्ध आहेत.

हे प्रांगण ‘शून्य कार्बन उत्सर्जन’ करणारे हरित प्रांगण आहे.  हे प्रांगण सौर ऊर्जा संयंत्र, घरगुती आणि पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणारे संयंत्र,100 एकर जलसाठा आणि इतर अनेक पर्यावरणपूरक सुविधांसह स्वयं-पूर्ण आहे.

 

|

या विद्यापीठाचा इतिहासाशी गहिरे नाते आहे.सुमारे 1600 वर्षांपूर्वी स्थापन झालेले मूळ नालंदा विद्यापीठ जगातील पहिल्या निवासी विद्यापीठांपैकी एक मानले जाते. 2016 मध्ये, नालंदाच्या अवशेषांना संयुक्त राष्ट्र वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

 

Click here to read full text speech

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi’s Version Of DOGE Since 2014 Could Have Saved Rs 5 Lakh Crore

Media Coverage

PM Modi’s Version Of DOGE Since 2014 Could Have Saved Rs 5 Lakh Crore
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address in the Lok Sabha on Mahakumbh
March 18, 2025

माननीय अध्यक्ष जी,

मैं प्रयागराज में हुए महाकुंभ पर वक्तव्य देने के लिए उपस्थित हुआ हूं। आज मैं इस सदन के माध्यम से कोटि-कोटि देशवासियों को नमन करता हूं, जिनकी वजह से महाकुंभ का सफल आयोजन हुआ। महाकुंभ की सफलता में अनेक लोगों का योगदान है। मैं सरकार के, समाज के, सभी कर्मयोगियों का अभिनंदन करता हूं। मैं देशभर के श्रद्धालुओं को, यूपी की जनता विशेष तौर पर प्रयागराज की जनता का धन्यवाद करता हूं।

अध्यक्ष जी,

हम सब जानते हैं गंगा जी को धरती पर लाने के लिए एक भागीरथ प्रयास लगा था। वैसा ही महाप्रयास इस महाकुंभ के भव्य आयोजन में भी हमने देखा है। मैंने लालकिले से सबका प्रयास के महत्व पर जोर दिया था। पूरे विश्व ने महाकुंभ के रूप में भारत के विराट स्वरूप के दर्शन किए। सबका प्रयास का यही साक्षात स्वरूप है। यह जनता-जनार्दन का, जनता-जनार्दन के संकल्पों के लिए, जनता-जनार्दन की श्रद्धा से प्रेरित महाकुंभ था।

आदरणीय अध्यक्ष जी,

महाकुंभ में हमने हमारी राष्ट्रीय चेतना के जागरण के विराट दर्शन किए हैं। यह जो राष्ट्रीय चेतना है, यह जो राष्ट्र को नए संकल्पों की तरफ ले जाती है, यह नए संकल्पों की सिद्धि के लिए प्रेरित करती है। महाकुंभ ने उन शंकाओं-आशंकाओं को भी उचित जवाब दिया है, जो हमारे सामर्थ्य को लेकर कुछ लोगों के मन में रहती है।

अध्यक्ष जी,

पिछले वर्ष अयोध्या के राम मंदिर प्राण प्रतिष्ठा समारोह में हम सभी ने यह महसूस किया था कि कैसे देश अगले 1000 वर्षों के लिए तैयार हो रहा है। इसके ठीक 1 साल बाद महाकुंभ के इस आयोजन ने हम सभी के इस विचार को और दृढ़ किया है। देश की यह सामूहिक चेतना देश का सामर्थ्य बताती है। किसी भी राष्ट्र के जीवन में, मानव जीवन के इतिहास में भी अनेक ऐसे मोड़ आते हैं, जो सदियों के लिए, आने वाली पीढ़ियों के लिए उदाहरण बन जाते हैं। हमारे देश के इतिहास में भी ऐसे पल आए हैं, जिन्होंने देश को नई दिशा दी, देश को झंकझोर कर जागृत कर दिया। जैसे भक्ति आंदोलन के कालखंड में हमने देखा कैसे देश के कोने-कोने में आध्यात्मिक चेतना उभरी। स्वामी विवेकानंद जी ने शिकागो में एक सदी पहले जो भाषण दिया, वह भारत की आध्यात्मिक चेतना का जयघोष था, उसने भारतीयों के आत्मसम्मान को जगा दिया था। हमारी आजादी के आंदोलन में भी अनेक ऐसे पड़ाव आए हैं। 1857 का स्वतंत्रता संग्राम हो, वीर भगत सिंह की शहादत का समय हो, नेताजी सुभाष बाबू का दिल्ली चलो का जयघोष हो, गांधी जी का दांडी मार्च हो, ऐसे ही पड़ावों से प्रेरणा पाकर भारत ने आजादी हासिल की। मैं प्रयागराज महाकुंभ को भी ऐसे ही एक अहम पड़ाव के रूप में देखता हूं, जिसमें जागृत होते हुए देश का प्रतिबिंब नजर आता है।

अध्यक्ष जी,

हमने करीब डेढ़ महीने तक भारत में महाकुंभ का उत्साह देखा, उमंग को अनुभव किया। कैसे सुविधा-असुविधा की चिंता से ऊपर उठते हुए, कोटि-कोटि श्रद्धालु, श्रद्धा-भाव से जुटे यह हमारी बहुत बड़ी ताकत है। लेकिन यह उमंग, यह उत्साह सिर्फ यही तक सीमित नहीं था। बीते हफ्ते मैं मॉरीशस में था, मैं त्रिवेणी से, प्रयागराज से महाकुंभ के समय का पावन जल लेकर गया था। जब उस पवित्र जल को मॉरीशस के गंगा तालाब में अर्पित किया गया, तो वहां जो श्रद्धा का, आस्था का, उत्सव का, माहौल था, वह देखते ही बनता था। यह दिखाता है कि आज हमारी परंपरा, हमारी संस्कृति, हमारे संस्कारों को आत्मसात करने की, उन्हें सेलिब्रेट करने की भावना कितनी प्रबल हो रही है।

अध्यक्ष जी,

मैं ये भी देख रहा हूं कि पीढ़ी दर पीढ़ी हमारे संस्कारों के आगे बढ़ने का जो क्रम है, वह भी कितनी सहजता से आगे बढ़ रहा है। आप देखिए, जो हमारी मॉडर्न युवा पीढ़ी है, ये कितने श्रद्धा-भाव से महाकुंभ से जुड़े रहे, दूसरे उत्सवों से जुड़े रहे हैं। आज भारत का युवा अपनी परंपरा, अपनी आस्था, अपनी श्रद्धा को गर्व के साथ अपना रहा है।

अध्यक्ष जी,

जब एक समाज की भावनाओं में अपनी विरासत पर गर्व का भाव बढ़ता है, तो हम ऐसे ही भव्य-प्रेरक तस्वीरें देखते हैं, जो हमने महाकुंभ के दौरान देखी हैं। इससे आपसी भाईचारा बढ़ता है, और यह आत्मविश्वास बढ़ता है कि एक देश के रूप में हम बड़े लक्ष्यों को प्राप्त कर सकते हैं। अपनी परंपराओं से, अपनी आस्था से, अपनी विरासत से जुड़ने की यह भावना आज के भारत की बहुत बड़ी पूंजी है।

अध्यक्ष जी,

महाकुंभ से अनेक अमृत निकले हैं, एकता का अमृत इसका बहुत पवित्र प्रसाद है। महाकुंभ ऐसा आयोजन रहा, जिसमें देश के हर क्षेत्र से, हर एक कोने से आए लोग एक हो गए, लोग अहम त्याग कर, वयम के भाव से, मैं नहीं, हम की भावना से प्रयागराज में जुटे। अलग-अलग राज्यों से लोग आकर पवित्र त्रिवेणी का हिस्सा बने। जब अलग-अलग क्षेत्रों से आए करोड़ों-करोड़ों लोग राष्ट्रीयता के भाव को मजबूती देते हैं, तो देश की एकता बढ़ती है। जब अलग-अलग भाषाएं-बोलियां बोलने वाले लोग संगम तट पर हर-हर गंगे का उद्घोष करते हैं, तो ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ की झलक दिखती है, एकता की भावना बढ़ती है। महाकुंभ में हमने देखा है कि वहां छोटे-बड़े का कोई भेद नहीं था, यह भारत का बहुत बड़ा सामर्थ्य है। यह दिखाता है कि एकता का अद्भुत तत्व हमारे भीतर रचा-बसा हुआ है। हमारी एकता का सामर्थ्य इतना है कि वो भेदने के सारे प्रयासों को भी भेद देता है। एकता की यही भावना भारतीयों का बहुत बड़ा सौभाग्य है। आज पूरे विश्व में जो बिखराव की स्थितियां हैं, उस दौर में एकजुटता का यह विराट प्रदर्शन हमारी बहुत बड़ी ताकत है। अनेकता में एकता भारत की विशेषता है, ये हम हमेशा कहते आए हैं, ये हमने हमेशा महसूस किया है और इसी के विराट रूप का अनुभव हमने प्रयागराज महाकुंभ में किया है। हमारा दायित्व है कि अनेकता में एकता की इसी विशेषता को हम निरंतर समृद्ध करते रहे।

अध्यक्ष जी,

महाकुंभ से हमें अनेक प्रेरणाएं भी मिली हैं। हमारे देश में इतनी सारी छोटी बड़ी नदियां हैं, कई नदियां ऐसी हैं, जिन पर संकट भी आ रहा है। कुंभ से प्रेरणा लेते हुए हमें नदी उत्सव की परंपरा को नया विस्तार देना होगा, इस बारे में हमें जरूर सोचना चाहिए, इससे वर्तमान पीढ़ी को पानी का महत्व समझ आएगा, नदियों की साफ-सफाई को बल मिलेगा, नदियों की रक्षा होगी।

अध्यक्ष जी,

मुझे विश्वास है कि महाकुंभ से निकला अमृत हमारे संकल्पों की सिद्धि का बहुत ही मजबूत माध्यम बनेगा। मैं एक बार फिर महाकुंभ के आयोजन से जुड़े प्रत्येक व्यक्ति की सराहना करता हूं, देश के सभी श्रद्धालुओं को नमन करता हूं, सदन की तरफ से अपनी शुभकामनाएं देता हूं।