पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खासदारांसाठीच्या बहुमजली सदनिकांचे उद्घाटन केले. या सदनिका दिल्लीतील डॉ बी डी मार्गावर आहेत. 76 सदनिका बांधण्यासाठी 80 वर्षाहून अधिक जुन्या आठ बंगल्यांचा पुनर्विकास करण्यात आला आहे.
याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, खासदारांसाठीच्या या बहुमजली सदनिकांमध्ये हरित इमारतीच्या नियमांचे पालन करण्यात आले आहे. या नवीन सदनिकांमुळे सर्व रहिवासी व खासदार सुरक्षित राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले, खासदारांचे निवास स्थान हा दीर्घकालीन प्रश्न होता परंतु आता त्याचे निराकरण झाले आहे. ते म्हणाले की दशकांपासून प्रलंबित असलेल्या जुन्या अडचणींना टाळून त्या सुटत नाहीत तर त्यांचे निराकरण शोधावे लागते. दिल्लीतील अशा अनेक प्रकल्पांची त्यांनी यादी वाचली जे बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण होते ज्यांना या सरकारने हाती घेतले आणि नियोजित वेळेपूर्वीच पूर्ण केले. ते म्हणाले, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची चर्चा सुरू झाली होती, 23 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या सरकारने हे स्मारक उभारले आहे. ते म्हणाले, बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली केंद्रीय माहिती आयोगाची नवीन इमारत, इंडिया गेटजवळील युद्ध स्मारक आणि राष्ट्रीय पोलिस स्मारक या सरकारने उभारले आहे.
सर्व खासदारांनी संसदेच्या उत्पादन आणि प्रक्रिया या दोन्ही गोष्टींची काळजी घेतली आहे आणि या दिशेने एक नवीन उंची गाठली पाहिजे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी यावेळी लोकसभा अध्यक्षांचे त्यांच्या कार्यक्षम कार्यपद्धतीसाठी कौतुक केले. नवीन नियम आणि अनेक सावधगिरीच्या उपायांसह, साथीच्या रोगाच्या काळातही संसदेचे कामकाज सुरू राहिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी दोन्ही सभागृहांनी संपूर्ण आठवडा काम केले.
ते म्हणाले की, युवकांसाठी 16-18 वर्ष हे वय अत्यंत महत्वाचे आहे, आम्ही 2019 च्या निवडणुकीबरोबरच 16 व्या लोकसभेची मुदत पूर्ण केली आहे आणि देशाच्या प्रगती व विकासासाठी हा काळ ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला आहे. ते पुढे म्हणाले की, 2019 मध्येच 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ सुरु झाला आहे आणि या काळात या लोकसभेने काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. पुढची (18वी) लोकसभा देखील देशाला नव्या दशकात पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा, विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दशकों से चली आ रही समस्याएं, टालने से नहीं, उनका समाधान खोजने से समाप्त होती हैं।
— PMO India (@PMOIndia) November 23, 2020
सिर्फ सांसदों के निवास ही नहीं, बल्कि यहां दिल्ली में ऐसे अनेकों प्रोजेक्ट्स थे, जो कई-कई बरसों से अधूरे थे: PM
हमारे देश में हजारों पुलिसकर्मियों ने कानून व्यवस्था बनाए रखने के लिए अपना जीवन दिया है।
— PMO India (@PMOIndia) November 23, 2020
उनकी याद में भी नेशनल पुलिस मेमोरियल का निर्माण इसी सरकार में हुआ: PM
Central Information Commission की नई बिल्डिंग का निर्माण इसी सरकार में हुआ।
— PMO India (@PMOIndia) November 23, 2020
देश में दशकों से वॉर मेमोरियल की बात हो रही थी। देश के वीर शहीदों की स्मृति में इंडिया गेट के पास वॉर मेमोरियल का निर्माण इसी सरकार में हुआ: PM
संसद की इस productivity में आप सभी सांसदों ने products और process दोनों का ही ध्यान रखा है।
— PMO India (@PMOIndia) November 23, 2020
हमारी लोकसभा और राज्यसभा, दोनों के ही सांसदों ने इस दिशा में एक नई ऊंचाई हासिल की है: PM
2019 के बाद से 17वीं लोकसभा का कार्यकाल शुरू हुआ है।
— PMO India (@PMOIndia) November 23, 2020
इस दौरान देश ने जैसे निर्णय लिए हैं, उससे ये लोकसभा अभी ही इतिहास में दर्ज हो गई है।
इसके बाद 18वीं लोकसभा होगी।
मुझे विश्वास है, अगली लोकसभा भी देश को नए दशक में आगे ले जाने के लिए बहुत महत्वपूर्ण भूमिका निभाएगी: PM
सामान्य तौर ये कहा जाता है कि युवाओं के लिए 16-17-18 साल की उम्र, जब वो 10th-12th में होते हैं, बहुत महत्वपूर्ण होती है।
— PMO India (@PMOIndia) November 23, 2020
अभी 2019 के चुनाव के साथ ही हमने 16वीं लोकसभा का कार्यकाल पूरा किया है।
ये समय देश की प्रगति के लिए, देश के विकास के लिए बहुत ही ऐतिहासिक रहा है: PM