पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी, कानपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी केली आणि आयआयटी मेट्रो स्थानक ते गीता नगर पर्यंत मेट्रोने प्रवासही केला. बिना-पानकी मल्टीप्रोडक्ट पाईपलाईन प्रकल्पाचेही त्यांनी उद्घाटन केले. मध्य प्रदेशातल्या बिना तेल शुद्धीकरण कारखान्यापासून कानपूरमधल्या पानकी पर्यंतच्या या प्रकल्पामुळे बीना तेल शुद्धीकरण कारखान्यातली उत्पादने या प्रदेशासाठी सहजसाध्य राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मेट्रो कनेक्टीव्हिटी आणि पाईपलाईन प्रकल्पाच्या उद्घाटना बद्दल पंतप्रधानांनी कानपूरच्या जनतेचे अभिनंदन केले.कानपूरशी असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचे स्मरण करत त्यांनी अनेक स्थानिक संदर्भांचा उल्लेख करत आपल्या भाषणाला सुरवात केली. मौज –मजा आणि बेफिकीर वृत्तीच्या कानपूरच्या जनतेच्या स्वभावाचा त्यांनी हलक्या – फुलक्या शब्दात उल्लेख केला.दीन दयाल उपाध्याय,अटल बिहारी वाजपेयी आणि सुरेद्र सिंह भंडारी यासारख्या दिग्गजांना घडवण्यात कानपूर शहराच्या असलेल्या भूमिकेचा त्यांनी उल्लेख केला. आज मंगळवार असल्याचे सांगून उत्तर प्रदेशच्या विकासात आणखी सुवर्ण अध्याय जोडला जात आहे त्यासाठी पानकीच्या हनुमान जी यांचा आशीर्वादही त्यांनी मागितला.
मागच्या काळात झालेल्या वेळेच्या नुकसानाची भरपाई करण्याचा उत्तर प्रदेश मधल्या दुहेरी इंजिन सरकारचा प्रयत्न असून दुप्पट वेगाने आमचे काम सुरु असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या बदलत्या प्रतिमेची दखल घेत याआधी अवैध हत्यारांसाठी ज्याचे नाव घेतले जायचे तो प्रदेश आता संरक्षण कॉरीडॉरचे केंद्र झाला आहे आणि देशाच्या सुरक्षेत योगदान देत आहे. कामाची ठरलेल्या वेळेतच पूर्तता करण्याच्या कार्य संस्कृती बद्दल बोलताना, पायाभरणी केलेले काम पूर्ण करण्यासाठी दुहेरी इंजिन सरकार अहोरात्र काम करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. आमच्या सरकारने कानपूर मेट्रोची पायाभरणी केली आणि त्याचे लोकार्पणही आम्हीच करत आहोत.आमच्या सरकारने पूर्वांचल द्रुतगती मार्गाचे भूमिपूजन केले आणि आमच्या सरकारने हे काम पूर्णत्वाला नेले असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातला आगामी सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विमानतळ, देशातला सर्वात लांब द्रुतगती मार्ग राज्यात बांधण्यात येत असून उत्तर प्रदेशात समर्पित मालवाहतूक कॉरीडॉर केंद्र यासारख्या महत्वाच्या बाबींचा उल्लेखही त्यांनी केला.
2014 या वर्षापूर्वी, उत्तर प्रदेशात धावणाऱ्या मेट्रोची एकूण लांबी 9 किमी इतकी होती. 2014 ते 2017 या दरम्यान, मेट्रोची लांबी 18 किलोमीटर्स पर्यंत वाढली. जर आपण आज लोकार्पण झालेल्या कानपूर रेल्वेला यात जोडले, तर राज्यातील मेट्रो सेवेची लांबी 90 किमीपर्यंत वाढली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
आधीच्या काळातील विकास असमतोल स्वरूपाचा होता असं सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की जर एखाद्या भागाचा विकास झाला, तर दूसरा भाग तसाच अविकसित राहत असे. “राज्यांच्या पातळीवर बघायचे झाल्यास, समाजामधील ही विषमता दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आमचे सरकार, “सबका साथ, सबका विकास” या मंत्रावर आमचे सरकार काम करत आहे. राज्यांच्या गरजा ओळखून, आमचे दुहेरी इंजिनाचे सरकार भरीव काम करत आहे. आधी, उत्तरप्रदेशातीळ कोट्यवधी घरांपर्यंत, पाईपने नळाचे पाणी पोहचत नव्हते. आज आपण ‘हर घर जल अभियानाच्या’ माध्यमातून उत्तरप्रदेशातील प्रत्येक घरात स्वच्छ पाणी नळाने पोहोचवण्यावर काम करत आहोत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
आमचे दुहेरी इंजिनचे सरकार उत्तरप्रदेशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीचे भान राखून अविरत काम करत आहे. मोठी उद्दिष्टे कशी निश्चित करायची, आणि ती पूर्णही कशी करायची, हे आमच्या या दुहेरी इंजिनच्या सरकारला माहीत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यानी वीज पारेषण, वीजेची व्यवस्था, शहरातील आणि नद्यांची स्वच्छता, अशा कामांची यादी सांगितली. आधीच्या काळात 2014 पर्यंत, शहरी भागातील गरिबांसाठी केवळ 2.5 लाख घरे बांधण्यात आली होती, मात्र, गेल्या साडे चार वर्षात, 17 लाख घरांना मंजूरी देण्यात आली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पहिल्यांदाच रस्त्यावरच्या फेरिवाल्यांकडे कोणत्या सरकारचे लक्ष गेले असून, पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या माध्यमातून उत्तरप्रदेशातील सात लाख पेक्षा अधिक लोकांना 700 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज मिळाले आहे, असेही त्यांनी संगितले. महामारीच्या काळात, केंद्र सरकारने राज्यातल्या 15 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना मोफत धान्य मिळण्याची व्यवस्था केली. 2014 सालापर्यंत देशात केवळ 14 कोटी स्वयंपाकाच्या गॅस जोडण्या होत्या. आता त्यांची संख्या 30 कोटींपेक्षा अधिक आहे. एकट्या उत्तरप्रदेशातच 1.60 कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस जोडणी मिळाली आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारली असल्याचा संदर्भ देत, पंतप्रधान म्हणाले की, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे उत्तरप्रदेशातून माफिया टोळ्यांचे उच्चाटन झाले आहे. राज्यात उद्योग व्यवसायाच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्र सरकारने कानपूर आणि फजलगंज इथे चर्म उद्योगाचे मोठे संकुल उभारण्यास मंजूरी दिली आहे. संरक्षण मार्गिका आणि एक जिल्हा, एक उत्पादन यांसारख्या योजनांचा कानपूर मधील उद्योजक आणि स्वयंउद्योजकांना लाभ मिळेल, असे ते म्हणाले. आज राज्यात गुन्हेगारांवर कायद्याचा वचक आहे, असे सांगत अलीकडेच राज्यात, अधिकाऱ्यांनी घातलेल्या छापेमारीतून अवैध पैसा मिळाल्याचा उल्लेख करत, या लोकांची कार्यसंस्कृती जनता बघते आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आज मंगलवार है और पनकी वाले हनुमान जी के आशीर्वाद से, आज यूपी के विकास में एक और सुनहरा अध्याय जुड़ रहा है।
— PMO India (@PMOIndia) December 28, 2021
आज कानपुर को मेट्रो कनेक्टिविटी मिली है।
साथ ही बीना रिफाइनरी से भी कानपुर अब कनेक्ट हो गया है: PM @narendramodi
आज उत्तर प्रदेश में जो डबल इंजन की सरकार चल रही है, वो बीते कालखंड में समय का जो नुकसान हुआ है, उसकी भरपाई में जुटी है।
— PMO India (@PMOIndia) December 28, 2021
हम डबल स्पीड से काम कर रहे हैं: PM @narendramodi
डबल इंजन की सरकार जिस काम का शिलान्यास करती है उसे पूरा करने के लिए हम दिन रात एक कर देते है।
— PMO India (@PMOIndia) December 28, 2021
कानपुर मेट्रो का शिलान्यास हमारी सरकार ने किया, हमारी सरकार इसका लोकार्पण भी कर रही है।
पूर्वांचल एक्सप्रेसवे का शिलान्यास हमारी सरकार ने किया, हमारी ही सरकार ने इसका काम पूरा किया: PM
साल 2014 से पहले, यूपी में जितनी मेट्रो चलती थी, उसकी कुल लंबाई थी 9 किलोमीटर।
— PMO India (@PMOIndia) December 28, 2021
साल 2014 से लेकर 2017 के बीच मेट्रो की लंबाई बढ़कर हुई कुल 18 किलोमीटर।
आज कानपुर मेट्रो को मिला दें तो यूपी में मेट्रो की लंबाई अब 90 किलोमीटर से ज्यादा हो चुकी है: PM @narendramodi
दशकों तक हमारे देश में ये स्थिति रही कि एक हिस्सा का तो विकास हुआ, दूसरा पीछे ही छूट गया।
— PMO India (@PMOIndia) December 28, 2021
राज्यों के स्तर पर, समाज के स्तर पर इस असमानता को दूर करना उतना ही जरूरी है।
इसलिए हमारी सरकार सबका साथ-सबका विकास के मंत्र पर काम कर रही है: PM @narendramodi
डबल इंजन की सरकार यूपी की जरूरतों को समझते हुए, दमदार काम कर रही है।
— PMO India (@PMOIndia) December 28, 2021
यूपी के करोड़ों घरों में पहले पाइप से पानी नहीं पहुंचता था।
आज हम हर घर जल मिशन से, यूपी के हर घर तक साफ पानी पहुंचाने में जुटे हैं: PM @narendramodi
यूपी में पहले जो सरकारें रहीं, उन्होंने माफियावाद का पेड़ इतना फैलाया कि उसकी छांव में सारे उद्योग-धंधे चौपट हो गए।
— PMO India (@PMOIndia) December 28, 2021
अब योगी जी की सरकार, कानून व्यवस्था का राज वापस लाई है।
इसलिए यूपी में अब निवेश भी बढ़ रहा है और अपराधी अपनी जमानत खुद रद्द करवा कर जेल जा रहे हैं: PM