




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील तारभ, महेसाणा येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी, रेल्वे, रस्ते, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, संशोधन आणि पर्यटन अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बरोब्बर महिन्यापूर्वी म्हणजे 22 जानेवारीला सहभागी झाल्याची आठवण त्यांनी आपल्या भाषणात करून दिली. 14 फेब्रुवारी रोजी वसंतपंचमीला अबुधाबी येथे आखाती देशांतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केल्याचा तसेच उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात कल्कीधामच्या पायाभरणीचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. तारभ येथील वलीनाथ महादेव मंदिरात आज पंतप्रधानांनी अभिषेक केला, दर्शन घेतले व पूजा केली.
जगासाठी वलीनाथ शिव धाम हे केवळ एक तीर्थक्षेत्र आहे, परंतु रेवाडी समाज आणि देशभरातील भक्तांसाठी ते पूज्य गुरूस्थान आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
देवकार्य आणि देशकार्य ही दोन्ही वेगाने सुरू असल्याने भारताच्या विकासाच्या प्रवासात सध्याच्या क्षणाचे महत्त्व पंतप्रधानांनी विशद केले. "एकीकडे हा कार्यक्रम झाला आणि 13,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण झाले किंवा पायाभरणी झाली," अशी माहिती त्यांनी दिली. रेल्वे, रस्ते, बंदर, वाहतूक, पाणी, सुरक्षा, शहरी विकास आणि पर्यटन प्रकल्पांमुळे राहणीमान सुलभ होईल आणि या भागातील तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
महेसाणाच्या पवित्र भूमीत दैवी ऊर्जा असून ती लोकांना भगवान कृष्ण आणि भगवान महादेव यांच्या हजारो वर्षांच्या आध्यात्मिक चेतनेशी तसेच गादीपती महंत वीरम-गिरी बापूजींच्या प्रवासाशी जोडते, असे पंतप्रधान म्हणाले. गादीपती महंत बलदेवगिरी बापूंचा संकल्प पुढे नेण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी महंत श्री जयरामगिरी बापू यांनादेखील त्यांनी अभिवादन केले. बलदेवगिरी बापूजींशी असलेल्या चार दशके जुन्या संबंधांना पंतप्रधानांनी उजाळा दिला आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री या नात्याने आपण त्यांचे अनेक वेळा आपल्या निवासस्थानी अध्यात्मिक चेतना जागृत करण्यासाठी स्वागत केल्याचे सांगितले. 2021 मध्ये बलदेवगिरी बापूजींचे निधन झाले आणि त्यांच्या संकल्पाच्या सिद्धीनंतर त्यांचा आत्मा आज सर्वांना आशीर्वाद देईल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शेकडो कारागीर आणि श्रमजीवींच्या योगदानावर आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत पंतप्रधान म्हणाले, “शेकडों वर्षे जुने मंदिर 21 व्या शतकातील भव्यतेने आणि प्राचीन परंपरांच्या दिव्यतेने पूर्ण झाले आहे.” वलीनाथ महादेव, हिंगलाज माता जी आणि भगवान दत्तात्रेय यांच्या प्रतिष्ठापनेसाठी कारागीरांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान म्हणाले की, ही मंदिरे फक्त प्रार्थनास्थळे नसून ती आपल्या प्राचीन सभ्यतेची प्रतीके आहेत. समाजात ज्ञानाचा प्रसार करण्यात मंदिरांची भूमिका पंतप्रधानांनी सांगितली. ज्ञान प्रसाराची परंपरा पुढे नेल्याबद्दल पंतप्रधानांनी स्थानिक धार्मिक आखाड्यांची प्रशंसा केली. पुस्तक पर्व तसेच शाळा आणि वसतिगृहाच्या स्थापनेमुळे लोकांमध्ये जागरूकता वाढली आणि शिक्षणाचा प्रसार झाला असे त्यांनी सांगितले.
देवासाठी केलेले कार्य आणि देशासाठी केलेले कार्य याचे याहून अधिक चांगले उदाहरण असू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. इतकी उज्ज्वल परंपरा जोपासल्याबद्दल त्यांनी रेवाडी समाजाचे कौतुक केले.
वलीनाथ धाममध्ये रुजलेल्या सब का साथ सब का विकासाच्या भावनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि या भावनेतूनच केंद्र सरकार देशातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले. समाजातील शेवटच्या घटकाच्या जीवनात परिवर्तन करण्याचे मोदींच्या गॅरंटीचे ध्येय आहे. देशात नव्याने निर्माण होत असलेली मंदिरे आणि कोट्यवधी गोरगरिबांसाठी बांधण्यात येत असलेली पक्की घरे यांचा उल्लेख करून त्यांनी नुकतेच 1.25 लाख घरांचे राष्ट्रार्पण आणि पायाभरणीचे स्मरण केले. देशातील 80 कोटी नागरिकांना मोफत शिधा देणे म्हणजे देवाचा प्रसाद होय तसेच 10 कोटी नवीन कुटुंबांना पाईपद्वारे पाणी देणे म्हणजे अमृत होय असे त्यांनी सांगितले. गुजरात मधील वारसा स्थळांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आणि गेल्या दोन दशकात केलेल्या पायाभूत सेवा सुविधा कामांचाही त्यांनी उल्लेख केला. भारतातील विकास आणि वारसा यांच्यात अनेक दशकांपासून निर्माण झालेला संघर्ष, पवित्र सोमनाथ मंदिर वादाचे ठिकाण बनणे, पावागडच्या जागेकडे दुर्लक्ष, मोढेरा येथील सूर्य मंदिराचे मतपेटीचे राजकारण, प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्याच्या मंदिराच्या विकासात अडथळे निर्माण झाल्याबद्दलच्या व्यथा त्यांनी व्यक्त केल्या. प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर मंदिराचे निर्माण झाल्यामुळे संपूर्ण देश हर्षोल्हासात असतात हेच लोक अजूनही नकारात्मकता पसरवत आहेत, असे ते म्हणाले.
नवीन भारतात आज होत असलेले प्रत्येक प्रयत्न हे येणाऱ्या पिढीसाठी वारसा ठरावेत, या दृष्टीने केले जात आहेत. आज निर्माण होत असलेले नवीन आणि आधुनिक रस्ते आणि रेल्वेमार्ग हे विकसित भारताचे मार्ग असतील. आज मेहसाणाकरता रेल्वे संपर्कयंत्रणेची सुविधा अधिक मजबूत झाली आहे. कांडला, टुना आणि मुंद्रा बंदरांसह बनासकांठा आणि पाटणची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे, असे ते म्हणाले. हवाई दलाच्या डीसा येथील तळाच्या धावपट्टीसाठी दीड वर्षांपूर्वी आपण पायाभरणी केल्याचे त्यांनी सांगितले. मोदी जी प्रतिज्ञा करतात ती पूर्ण करतात आणि डीसा हे त्याचेच उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
उत्तर गुजरातमध्ये औद्योगिकीकरणाच्या व्याप्तीसह संधी फारच मर्यादित होत्या, असा 20 ते 25 वर्षांपूर्वीचा काळ आठवून पंतप्रधानांनी पशुपालकांची आव्हाने आणि शेतातील सिंचन याकडे लक्ष वेधले. सध्याच्या सरकारने आणलेले सकारात्मक बदल अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की आता शेतकरी वर्षभरात दोन ते तीन पिके घेतात आणि या संपूर्ण प्रदेशातील जलपातळी देखील वाढली आहे. पाणीपुरवठा आणि जलस्रोतांशी संबंधित 1500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या 8 प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की, यामुळे उत्तर गुजरातच्या पाण्याची समस्या सोडवण्यात आणखी मदत होईल. ठिबक सिंचनासारखे आधुनिक तंत्रज्ञान आणि रसायनमुक्त नैसर्गिक शेतीचा उदयोन्मुख कल आत्मसात केल्याबद्दल त्यांनी उत्तर गुजरातमधील शेतकऱ्यांचे कौतुक केले. “तुमचे प्रयत्न देशभरातील शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित करेल”, असे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी देशाचा विकास करण्यासाठीच्या तसेच आपला समृद्ध वारसा जतन करण्यासाठीच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांवर भर दिला तसेच आजच्या विकास प्रकल्पांबद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि गुजरात सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी मेहसाणातील तारभ येथील सार्वजनिक कार्यक्रमात 8 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींना अतिजलद (हाय-स्पीड) इंटरनेट पुरवणाऱ्या भारत नेट टप्पा दोन-गुजरात फायबर ग्रीड नेटवर्क लिमिटेडसह महत्त्वाचे प्रकल्प, रेल्वे मार्ग दुहेरीकरण, गेज रूपांतरण, महेसाणा आणि बनासकांठा जिल्ह्यांमध्ये नवीन ब्रॉड गेज मार्गासाठी अनेक प्रकल्प; खेडा, गांधीनगर, अहमदाबाद आणि महेसाणा येथे अनेक रस्ते प्रकल्प; गांधीनगर येथे गुजरात जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची मुख्य शैक्षणिक इमारत; याबरोबरच बनासकांठा येथे अनेक पाणीपुरवठा प्रकल्प यांचे राष्ट्रार्पण केले.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक खासदार, आमदार आणि गुजरात सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी मेहसाणातील तारभ येथील सार्वजनिक कार्यक्रमात 8 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींना अतिजलद (हाय-स्पीड) इंटरनेट पुरवणाऱ्या भारत नेट टप्पा दोन-गुजरात फायबर ग्रीड नेटवर्क लिमिटेडसह महत्त्वाचे प्रकल्प, रेल्वे मार्ग दुहेरीकरण, गेज रूपांतरण, महेसाणा आणि बनासकांठा जिल्ह्यांमध्ये नवीन ब्रॉड गेज मार्गासाठी अनेक प्रकल्प; खेडा, गांधीनगर, अहमदाबाद आणि महेसाणा येथे अनेक रस्ते प्रकल्प; गांधीनगर येथे गुजरात जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची मुख्य शैक्षणिक इमारत; याबरोबरच बनासकांठा येथे अनेक पाणीपुरवठा प्रकल्प यांचे राष्ट्रार्पण केले.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते आणंद जिल्ह्यातील नवीन जिल्हास्तरीय रुग्णालय आणि आयुर्वेदिक रुग्णालयासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प; बनासकांठामधील अंबाजी प्रदेशातील रिंछडिया महादेव मंदिर आणि तलावाचा विकास; गांधीनगर, अहमदाबाद, बनासकांठा आणि महेसाणा येथे अनेक रस्ते प्रकल्प; डीसा येथील वायुदलाची धावपट्टी; अहमदाबादमधील मानवी आणि जैव विज्ञान दालन; गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केन्द्र (जीबीआरसी) गिफ्ट सिटी येथे नवीन इमारत; गांधीनगर, अहमदाबाद आणि बनासकांठा येथे पाणीपुरवठा सुधारण्यासाठी अनेक प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली.
ये एक ऐसा समय है, जब देवकाज हो या फिर देश काज, दोनों तेज़ गति से हो रहे हैं: PM @narendramodi pic.twitter.com/2uE2pHY96s
— PMO India (@PMOIndia) February 22, 2024
एक तरफ देश में देवालय भी बन रहे हैं और करोड़ों गरीबों के पक्के घर भी बन रहे हैं। pic.twitter.com/rv35W0rd22
— PMO India (@PMOIndia) February 22, 2024
आज नए भारत में हो रहा हर प्रयास, भावी पीढ़ी के लिए विरासत बनाने का काम कर रहा है। pic.twitter.com/iLQFqRlScp
— PMO India (@PMOIndia) February 22, 2024