पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मधील केवडिया येथे 160 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.86492900_1698761207_1-1.jpg)
उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये एकता नगर ते अहमदाबाद हेरिटेज ट्रेन; नर्मदा आरती प्रत्यक्ष दर्शन प्रकल्प; कमलम पार्क; स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतील पायवाट; 30 नवीन ई-बस, 210 ई- सायकली आणि बहुविध गोल्फ कार्ट; एकता नगर येथे सिटी गॅस वितरण नेटवर्क आणि गुजरात राज्य सहकारी बँकेचे ‘सहकार भवन’ यांचा समावेश आहे. त्यानंतर, पंतप्रधानांनी केवडिया येथे ट्रॉमा सेंटर आणि सोलर पॅनेलसह उपजिल्हा रुग्णालयाची पायाभरणी केली.
![](https://cdn.narendramodi.in/cmsuploads/0.59638800_1698761226_1-2.jpg)
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्यात भाग घेतला.