Quote“भारतीय आरोग्यक्षेत्राने जागतिक पातळीवर निर्माण केलेल्या विश्वासार्हतेमुळेच, अलीकडच्या काळात, भारताला ‘जागतिक औषधनिर्मितीचे केंद्र’अशी बिरुदावली मिळाली”
Quote“संपूर्ण मानवतेच्या कल्याणावर आमचा विश्वास आहे आणि, कोविड-19 महामारीच्या काळात आम्ही आमचा हा ध्येयवाद संपूर्ण जगाला दाखवला आहे”
Quote“औषधनिर्मिती उद्योगाला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांची भारताकडे मोठी उपलब्धता, ‘संशोधन करा आणि भारतात निर्मिती करा’ यासाठीही या शक्तिची जोपासना करणे आवश्यक.”
Quote“लसी आणि औषधांमधील प्रमुख घटकांचे देशांतर्गत उत्पादन झपाट्याने वाढवण्याविषयी विचार करणे अत्यावश्यक. या क्षेत्रात भारताने आघाडी घेण्याची गरज”
Quote“भारतात संकल्पना तयार करा, संशोधन करा, भारतात निर्मिती करा आणि जगासाठी निर्मिती करा यासाठी सर्वांना माझे आमंत्रण”आपली खरी शक्ति ओळखा आणि विश्वाची सेवा करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज औषधनिर्मिती क्षेत्रातील पहिल्या जागतिक नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्‌घाटन झाले . यावेळी केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया उपस्थित होते.

“कोविड-19 महामारीमुळे औषध निर्मिती क्षेत्र प्रकाशझोतात आले आहे. जीवनशैली असो, की वैद्यकीय तंत्रज्ञान, अथवा लसी, आरोग्य क्षेत्राच्या प्रत्येक पैलूकडे गेल्या दोन वर्षात, जगाचे लक्ष वेधले गेले आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

|

या संदर्भात पंतप्रधान म्हणाले की, भारतीय औषध निर्मिती उद्योगही आव्हानाचा सामना करण्यासाठी पुढे सरसावला आहे. “भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राने कमावलेल्या जागतिक विश्वासामुळे अलीकडच्या काळात भारताला “जगाचे औषध निर्मिती केंद्र ” म्हटले जात आहे,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी स्पष्ट केले की “आपली  निरामय आरोग्याची  व्याख्या भौतिक सीमांपुरती मर्यादित नाही. आमचा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणावर विश्वास आहे. आणि, कोविड-19 या जागतिक महामारीच्या काळात आम्ही या भावनेचे दर्शन   संपूर्ण जगाला घडवले आहे.” महामारी दरम्यान, “सुरुवातीच्या टप्प्यात 150 हून अधिक देशांमध्ये जीवरक्षक औषधे आणि वैद्यकीय उपकरणे आम्ही निर्यात केली. आम्ही यावर्षी जवळपास 100 देशांना  कोविड लसींच्या  65 दशलक्षाहून अधिक मात्रा निर्यात केल्या आहेत”, असे पंतप्रधानांनी सांगितले.

नावीन्यपूर्ण संशोधनासाठी एक परिसंस्था निर्माण करण्याची कल्पना पंतप्रधानांनी मांडली जी भारताला औषधांचा  शोध आणि नाविन्यपूर्ण वैद्यकीय उपकरणांमध्ये अग्रेसर बनवेल. ते म्हणाले की सर्व हितधारकांशी व्यापक सल्लामसलत करून धोरणात्मक उपाययोजना केल्या  जात आहेत. भारतात औषध निर्मिती उद्योगाला आणखी उंचीवर नेण्याची क्षमता असलेले शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचा मोठा समूह असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. “या ताकदीचा उपयोग “डिस्कव्हर अँड मेक इन इंडिया” साठी करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

स्वदेशी क्षमता विकसित करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. “आज, जेव्हा भारतातील 1.3 अब्ज लोकांनी भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प केला  आहे, तेव्हा आपण लसी आणि औषधांच्या प्रमुख घटकांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा विचार केला पाहिजे. या आघाडीवर  भारताला यश मिळवायचे आहे”, असे आवाहन पंतप्रधानांनी  केले.

पंतप्रधानांनी हितधारकांना  देशात नवीन कल्पना मांडण्याचे , नवसंशोधन करण्यासाठी , मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्डसाठी आमंत्रित केले. तुमची खरी ताकद शोधा आणि जगाची सेवा करा, असे  त्यांनी सांगितले.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

  • Reena chaurasia August 29, 2024

    bjp
  • ranjeet kumar April 15, 2022

    jay sri ram🙏🙏🙏
  • शिवकुमार गुप्ता February 20, 2022

    जय माँ भारती
  • शिवकुमार गुप्ता February 20, 2022

    जय भारत
  • शिवकुमार गुप्ता February 20, 2022

    जय हिंद
  • शिवकुमार गुप्ता February 20, 2022

    जय श्री सीताराम
  • शिवकुमार गुप्ता February 20, 2022

    जय श्री राम
  • DR HEMRAJ RANA February 19, 2022

    धर्म ध्वज रक्षक छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्र के प्रेरणा पुरुष हैं। उन्होंने धर्म, राष्ट्रीयता, न्याय और जनकल्याण के स्तम्भों पर सुशासन की स्थापना कर भारतीय वसुंधरा को गौरवांवित किया। शिव-जयंती पर अद्भुत शौर्य और देशभक्ति की अद्वितीय प्रतिमूर्ति के चरणों में वंदन करता हूँ।
  • G.shankar Srivastav January 03, 2022

    जय हो
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
When PM Modi Visited ‘Mini India’: A Look Back At His 1998 Mauritius Visit

Media Coverage

When PM Modi Visited ‘Mini India’: A Look Back At His 1998 Mauritius Visit
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 मार्च 2025
March 11, 2025

Appreciation for PM Modi’s Push for Maintaining Global Relations