पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
डेन्मार्कच्या पंतप्रधानपदी मेटे फ्रेडरिक्सन यांची दुसऱ्यांदा नेमणूक झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी भारत-डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.दोन्ही देशांमध्ये नुकतेच झालेले उच्च-स्तरीय आदानप्रदान तसेच वाढत्या सहकार्याबद्दल या नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांना भारताच्या विद्यमान जी-20 समूहाच्या अध्यक्षतेविषयी तसेच देशाच्या महत्त्वाच्या प्राधान्याक्रमांविषयी थोडक्यात माहिती दिली.पंतप्रधान फ्रेडरिकसन यांनी भारताच्या जी-20 विषयक उपक्रमांची प्रशंसा केली आणि या उपक्रमांना डेन्मार्कचा संपूर्ण पाठींबा व्यक्त केला.
पुढच्या वर्षी, 2024 मध्ये येत असलेला भारत-डेन्मार्क संबंधांचा 75वा वर्धापनदिन योग्य पद्धतीने साजरा करण्याबाबत तसेच दोन्ही देशांदरम्यान असलेल्या संबंधांमध्ये वैविध्य आणण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांचा शोध घेण्याबाबत दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली.