पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस महामहिम शेख डॉ मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांच्याशी आंतर-धर्मीय संवादाला चालना, उग्रवादी विचारसरणींचा प्रतिकार , जागतिक शांततेला प्रोत्साहन आणि भारत- सौदी अरेबिया दरम्यान भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली.
महामहिम शेख डॉ. मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांनी या बैठकीबाबत केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“मुस्लिम वर्ल्ड लीगचे सरचिटणीस आणि मुस्लिम विद्वानांच्या संघटनेचे अध्यक्ष शेख डॉ मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसा यांना भेटून आनंद झाला. आंतर-धर्मीय संवादाला चालना, उग्रवादी विचारसरणींचा प्रतिकार, जागतिक शांततेला प्रोत्साहन आणि भारत- सौदी अरेबिया दरम्यान भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत आम्ही व्यापक चर्चा केली."
Pleased to have met H.E. Sheikh @MhmdAlissa, Secretary General of @MWLOrg and Chairman of the Organisation of Muslim Scholars. We had a great exchange of views on furthering inter-faith dialogue, countering extremist ideologies, promoting global peace, and deepening partnership… https://t.co/yenOiez6Vt
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2023