पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान मोहिमेची आणि रक्तदात्यांची प्रशंसा केली आहे.
‘रक्त दान करा, प्लाझ्मा दान करा, वारंवार दान करा’, हा संदेश देत जागतिक रक्तदाता दिवस आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
रक्तदान अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून रक्तदात्यांचा सन्मान करत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“सर्व रक्तदात्यांची मी प्रशंसा करतो. त्यांच्या दयाळूपणामुळे असंख्य लोकांचे प्राण वाचतात . यामधून भारताच्या सेवा आणि करुणा या मूल्यांना बळकटी मिळते.”
I commend all the blood donors. Their act of kindness leads to countless lives being saved. It also reaffirms India's ethos of service and compassion. https://t.co/DrmuCU2rQ7
— Narendra Modi (@narendramodi) June 14, 2023