खादी विक्रीने नोंदवलेला नवा विक्रम म्हणजे उत्साहवर्धक कामगिरी असल्याचे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विक्रमाचे आज कौतुक केले आहे. देशातल्या नागरिकांमध्ये स्वदेशीचा कल वेगाने वाढत असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
खादी इंडियाने एक्स या समाजमाध्यमावर केलेल्या एका संदेशाला प्रतिसाद देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश :
“अतिशय उत्साहवर्धक कामगिरी! खादी विक्रीचा हा नवा विक्रम हेच दर्शवतो की देशाच्या नागरिकांमध्ये स्वदेशीचा कल किती वेगाने वाढतो आहे. मला आनंद आहे की, ही भावना खादीशी जोडल्या गेलेल्या आपल्या कारागीर बंधू - भगिनींचे जीवन सुकर होण्यातही खूपच उपयुक्त ठरू लागली आहे.”
बहुत उत्साहवर्धक उपलब्धि! खादी की ब्रिकी का यह नया रिकॉर्ड बताता है कि देशवासियों के बीच स्वदेशी को लेकर रुझान किस तेजी से बढ़ रहा है। मुझे खुशी है कि यह भावना खादी से जुड़े हमारे कारीगर भाई-बहनों के जीवन को भी आसान बनाने में बहुत मददगार बनी है। https://t.co/blmN8RRGZq
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2024