अवंतीपोरा आणि काकापोरा दरम्यान असलेल्या रत्नीपोरा थांब्याची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असल्याचे ट्विट रेल्वे मंत्रालयाने केले आहे. रेल मार्गावर या थांब्यामुळे या प्रदेशात वाहतूक सुलभ,सुगम करणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"जम्मू आणि काश्मीरमध्ये कनेक्टिव्हीटी वाढवण्यासंदर्भातली ही चांगली बातमी"
Good news for deepening connectivity in Jammu and Kashmir. https://t.co/9Nnk22GoJi
— Narendra Modi (@narendramodi) May 11, 2023