जप्त करण्यात आलेले 1,44,000 किलो अमली पदार्थ नष्ट करत भारताने अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यात गाठलेल्या ऐतिहासिक टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, या कामगिरीमुळे भारताने केवळ एका वर्षात 12,000 कोटी रुपयांचे 1 दशलक्ष किलो अमली पदार्थ नष्ट करण्याचा विस्मयकारक विक्रम केला आहे.
अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील प्रादेशिक परिषदेत ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली. अमली पदार्थमुक्त भारताच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेप्रती गृह मंत्रालयाच्या दृढ आणि अथक प्रयत्नाचे हे उदाहरण आहे.
प्रत्युत्तरात पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले:
"उत्तम! भारताला अंमली पदार्थांपासून मुक्त करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ मिळाले."
Great! Adds strength to our efforts to make India free from the drugs menace. https://t.co/JT77u8aOqT
— Narendra Modi (@narendramodi) July 17, 2023