वाराणसी येथे 644 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या रोपवेच्या बांधकामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली .
वाराणसीत 644 कोटी रुपये खर्चाचा 3.85 किमी लांबीचा रोपवे वाहतुकीसाठी उभारण्यात येत आहे अशी माहिती देणारा, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा ट्विट संदेश सामायिक करत पंतप्रधानांनी खालील ट्विट केले आहे ,
"भक्ती आणि तंत्रज्ञानाचा अद्भुत संगम ! वाराणसीत तयार होणाऱ्या या रोपवेमुळे भाविकांसाठी यात्रेचा अनुभव अधिक रोचक आणि संस्मरणीय होईल. या रोपवेमुळे बाबा विश्वनाथांचे दर्शन घेणे सोयीचे होईल."
आस्था और टेक्नोलॉजी का अद्भुत संगम! वाराणसी में तैयार हो रहे इस रोप-वे से श्रद्धालुओं के लिए यात्रा का अनुभव बहुत रोचक और यादगार तो होगा ही, इससे बाबा विश्वनाथ के दर्शन में भी उन्हें बहुत सुविधा होगी। https://t.co/AMbBQsdEdr
— Narendra Modi (@narendramodi) March 29, 2023