कृष्णा गोदावरी खोऱ्यातील (केजी-डीडब्ल्यूएन-98/2 ब्लॉक बंगालच्या उपसागर किनाऱ्याच्या भागात) सखोल पाण्यातून तेल उत्खननाला सुरुवात झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी एक्स पोस्टवर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
“भारताच्या उर्जा प्रवासातील ही अत्यंत उल्लेखनीय पायरी आहे आणि यातून आत्मनिर्भर भारत उभारणीच्या आमच्या अभियानाला मोठी चालना मिळाली आहे. या उपक्रमामुळे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी देखील बरेच लाभ होणार आहेत.”
This is a remarkable step in India’s energy journey and boosts our mission for an Aatmanirbhar Bharat. It will have several benefits for our economy as well. https://t.co/yaW7xozVQx
— Narendra Modi (@narendramodi) January 8, 2024