झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या या राज्याची प्रगतीपथावर वेगाने वाटचाल होवो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“झारखंडमधील आपल्या बंधू भगिनींना राज्य स्थापना दिनानिमित्त अनेकानेक शुभेच्छा. आदिवासी समाजाचा संघर्ष आणि बलिदानाने पावन झालेल्या या भूमीने देशाला नेहमीच सन्मान प्राप्त करून दिला आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेला हा प्रदेश वेगाने प्रगती करो हीच माझी सदिच्छा.”
झारखंड के अपने सभी भाई-बहनों को राज्य के स्थापना दिवस पर अनेकानेक शुभकामनाएं। जनजातीय समाज के संघर्ष और बलिदान से सिंचित इस धरती ने देश को हमेशा गौरवान्वित किया है। मेरी कामना है कि प्राकृतिक संसाधनों से परिपूर्ण यह प्रदेश प्रगति के पथ पर तेज रफ्तार से आगे बढ़े।
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2024