पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या धनत्रयोदशीच्या म्हणजेच आरोग्य , सुख आणि समृद्धीच्या उत्सवाच्या देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री धन्वंतरीच्या आशीर्वादाची कामना करत मोदी यांनी सर्व नागरिकांना आरोग्यपूर्ण , समृद्ध आणि सुखी जीवन लाभो आणि त्यातूनच विकसित भारताच्या संकल्पाला नवीन ऊर्जा प्राप्त होत रहो या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी एक्सवर टाकलेल्या संदेशात म्हटले आहे,
"देशातील माझ्या सर्व कुटुंबीयांना आरोग्य तसेच सुख समृद्धीचे प्रतीक असलेल्या धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा. भगवान धन्वंतरीच्या कृपेने आपणा सर्वांना सदैव आरोग्य समृद्धी आणि सुख लाभो आणि त्यातूनच विकसित भारताच्या संकल्पनेला नवीन ऊर्जा मिळत राहो.”
देश के मेरे सभी परिवारजनों को आरोग्य एवं सुख-समृद्धि के प्रतीक पर्व धनतेरस की बहुत-बहुत बधाई। मेरी कामना है कि भगवान धन्वंतरि की कृपा से आप सभी सदैव स्वस्थ, संपन्न और प्रसन्न रहें, जिससे विकसित भारत के संकल्प को नई ऊर्जा मिलती रहे।
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2023