पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रसेवेसाठी समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ला त्यांच्या 100व्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
मोदींनी मोहन भागवत यांच्या भाषणाच्या व्हिडिओची लिंक सामायिक करताना सांगितले :
“राष्ट्रसेवेसाठी समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस आज आपल्या 100व्या वर्षात प्रवेश करत आहे. या अखंड प्रवासाच्या ऐतिहासिक टप्प्यावर सर्व स्वयंसेवकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि अनंत शुभकामना. मां भारतीसाठी असलेला हा संकल्प आणि हे समर्पण देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देण्यासोबतच ‘विकसित भारत’ घडविण्यासाठीही नवी ऊर्जा देणारे ठरेल. आज विजयादशमीच्या शुभ प्रसंगी माननीय सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण नक्की ऐकावे…”
राष्ट्र सेवा में समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यानि आरएसएस आज अपने 100वें वर्ष में प्रवेश कर रहा है। अविरल यात्रा के इस ऐतिहासिक पड़ाव पर समस्त स्वयंसेवकों को मेरी हार्दिक बधाई और अनंत शुभकामनाएं। मां भारती के लिए यह संकल्प और समर्पण देश की हर पीढ़ी को प्रेरित करने के साथ ही…
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2024