पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक रेडिओ दिनानिमित्त रेडिओच्या सर्व श्रोत्यांना आणि आपल्या प्रतिभेने तसेच सर्जनशीलतेने हे उत्कृष्ट माध्यम अधिक समृद्ध करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विटच्या संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"रेडिओच्या सर्व श्रोत्यांना आणि या उत्कृष्ट माध्यमाला आपल्या प्रतिभेने आणि सर्जनशीलतेने समृद्ध करणाऱ्या सर्वाना जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा. घरी असो, प्रवासादरम्यान असो आणि अन्यथा इतर कुठलेही ठिकाण असो, रेडिओ हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे.लोकांशी जोडले जाण्याचे हे एक अद्भुत माध्यम आहे."
रेडिओ हे सकारात्मकता सामायिक करण्याचे तसेच इतरांच्या जीवनात दर्जात्मक बदल घडवून आणण्यात आघाडीवर असलेल्यांना ओळख मिळवून देण्याचे एक उत्तम माध्यम असू शकते याचा मी "#MannKiBaat मुळे वारंवार प्रत्यय घेतला आहे. या कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचें मी आभार व्यक्त करतो.
World Radio Day greetings to all radio listeners and those who enrich this outstanding medium with their talent as well as creativity. Be it at home, during journeys and otherwise, the radio remains an integral part of people’s lives. It is an amazing medium to connect people.
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2022