श्री गुरु ग्रंथ साहिबजी च्या पहिल्या प्रकाश पूरब च्या मंगलदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“ श्री गुरु ग्रंथ साहिब आपल्याला सेवा आणि करुणेची शिकवण देतो आणि आपल्यातील सौहार्द वृद्धिंगत करतो. एका न्याय्य आणि समतेच्या समाजाची निर्मिती करण्यासाठी हा ग्रन्थ आपल्या सर्वांसाठी पथदर्शक आहे. कधीही अन्यायासमोर झुकू नका, अशी शिकवण हा ग्रंथ आपल्याला देतो, श्री गुरु ग्रंथ साहिबच्या पहिल्या प्रकाश पूरबनिमित्त सर्वांना शुभेच्छा!
श्री गुरु ग्रंथ साहिबची पवित्र शिकवण आणि ज्ञानाने संपूर्ण जग उजळून गेले आहे.
या ग्रंथापासून प्रेरणा घेत, शिखांनी जागतिक स्तरावर अनेक क्षेत्रात मोठे काम आणि सेवा केली आहे. त्यांचे धैर्य आणि दयाभावना अत्यंत कौतुकास्पद आहे.
श्री गुरु ग्रंथ साहिब जी चे मार्गदर्शन संपूर्ण मानवतेला कायम मिळत राहो.” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
The Sri Guru Granth Sahib Ji teaches us service, compassion and furthers harmony. It lays out the path towards a just and equal society. It also teaches us never to bow to injustice. Best wishes on the first Parkash Purab of the Sri Guru Granth Sahib Ji. 🙏🏼 pic.twitter.com/t9t1eOxIH4
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2020