पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा मधील जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. ही राज्ये भारताच्या विकासात सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्या निरंतर प्रगतीसाठी प्रार्थना करतो. "
Greetings to the people of Manipur, Meghalaya and Tripura on their Statehood Days. These states are making vibrant contributions to India’s development. Praying for their constant progress.
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2022