पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीच्या शुभप्रसंगी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत .
पंतप्रधान म्हणाले की, महर्षी वाल्मिकी यांचे सामाजिक समता आणि सद्भावनेबाबतचे विचार आजही समाजाला मार्गदर्शक ठरत आहेत. आपल्या विचारांच्या माध्यमातून ते युगानुयुगे आपली सभ्यता आणि संस्कृतीचा अमूल्य वारसा बनून राहतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"देशवासीयांना वाल्मिकी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सामाजिक समता आणि सद्भावनेच्या बाबतीतले त्यांचे अमूल्य विचार आजही भारतीय समाजाला मार्गदर्शक ठरत आहेत. मानवते संदर्भातील आपल्या विचारांच्या माध्यमातून ते युगानुयुगे आपली सभ्यता आणि संस्कृतीचा अमूल्य वारसा बनून राहतील.
देशवासियों को वाल्मीकि जयंती की अनंत शुभकामनाएं। सामाजिक समानता और सद्भावना से जुड़े उनके अनमोल विचार आज भी भारतीय समाज को सिंचित कर रहे हैं। मानवता के अपने संदेशों के माध्यम से वे युगों-युगों तक हमारी सभ्यता और संस्कृति की अमूल्य धरोहर बने रहेंगे। pic.twitter.com/wls3yN8ZfJ
— Narendra Modi (@narendramodi) October 28, 2023