पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या स्थापना दिनानिमित्त दलातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
“एनडीआरएफ दलातील मेहनती कर्मचाऱ्यांना दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. अनेक बचाव आणि मदत विषयक उपाययोजनांमध्ये आणि बहुतेकदा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करण्यात या दलाचे कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात. एनडीआरएफचे धाडस आणि व्यावसायिकता अत्यंत प्रेरणादायी आहेत. या दलाच्या भविष्यातील कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा.
आपत्ती व्यवस्थापन हा सरकारसाठी आणि धोरणकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपत्ती येऊन गेल्यानंतरच्या काळात मदत कार्यातील आपत्ती व्यवस्थापन दलाच्या सक्रीय दृष्टीकोनासोबतच आपल्याला आपत्तींच्या प्रती लवचिक असलेल्या पायाभूत सुविधांचा देखील विचार करायला हवा आणि या विषयातील संशोधनावर भर द्यायला हवा.
भारताने ‘आपत्ती व्यवस्थापन सुविधांसाठी संयुक्त आघाडी’च्या रुपात काही प्रयत्न सुरु केले आहेत. कोणत्याही प्रकारच्या आव्हानात्मक परिस्थितीत जीवित आणि मालमत्ता यांचा अधिकाधिक बचाव करण्याच्या उद्देशाने आपण आपल्या एनडीआरएफच्या पथकांचे कौशल्य अधिक चांगले करण्यासंबंधी काम करीत आहोत.”
Greetings to the hardworking @NDRFHQ team on their Raising Day. They are at the forefront of many rescue and relief measures, often in very challenging circumstances. NDRF’s courage and professionalism are extremely motivating. Best wishes to them for their future endeavours. pic.twitter.com/t7LlIpGy3l
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2022