पंतप्रधानांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच एनसीसी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय छात्र सेनेच्या भारतभरातील माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय छात्र सेना माजी विद्यार्थी संस्थेला सहकार्य करावे आणि संस्थेच्या विविध उपक्रमात आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे की एकात्मता आणि शिस्तपालन हे बोधवाक्य असणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेनेला शुभेच्छा. राष्ट्रीय छात्र सेना देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेच्या कसोटीचा आणि देश उभारणीत योगदान अनुभव देते. मी यावर्षी जानेवारीत झालेल्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या संचलनात भाषण केले.
काही दिवसांपूर्वी झांशी येथे झालेल्या राष्ट्ररक्षा समर्पण पर्वात मला राष्ट्रीय छात्र सेनेच्या माजी विद्यार्थी संस्थेचा पहिला सभासद म्हणून नोंदणी करण्याचा मान मिळाला. राष्ट्रीय छात्र सेनेशी संलग्न असणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी माजी विद्यार्थी संस्थेची स्थापना हा एक प्रशंसनीय प्रयत्न आहे.
A few days back, during the 'Rashtra Raksha Samparpan Parv’ in Jhansi, I was honoured to register as the first member of the NCC Alumni Association. The formation of an Alumni Association is a commendable effort to bring together all those who have been associated with NCC. pic.twitter.com/MFuCf5YD0g
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2021
मी देशभरातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या माझी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी राष्ट्रीय छात्र सेना माजी विद्यार्थी संस्थेला संस्थेशी संपर्क साधून त्यांच्या कामात सहकार्य आणि सक्रिय सहभाग नोंदवावा. भारत सरकारने राष्ट्रीय छात्र सेनेचा अनुभव अधिक चांगला आणि परिणामकारक व्हावा यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.