पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रत्येकाच्या जीवनातील स्नेहभाव आणि सौहार्दाची भावना या सणाच्या निमित्ताने वृध्दिंगत होवो, अशी भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
आपल्या X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"माझ्या परिवारातील सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. बहीण आणि भाऊ यांच्यातील विश्वास आणि अगाध प्रेमाला समर्पित असलेला रक्षाबंधनाचा हा मंगलमय सण आपल्या संस्कृतीचे पवित्र प्रतिबिंब आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात स्नेह, सद्भाव और सौहार्दाच्या भावनेला वृद्धिंगत करो, अशी भावना मी प्रकट करत आहे.”
मेरे सभी परिवारजनों को रक्षाबंधन की हार्दिक शुभकामनाएं। बहन और भाई के बीच अटूट विश्वास और अगाध प्रेम को समर्पित रक्षाबंधन का ये पावन पर्व, हमारी संस्कृति का पवित्र प्रतिबिंब है। मेरी कामना है, यह पर्व हर किसी के जीवन में स्नेह, सद्भाव और सौहार्द की भावना को और प्रगाढ़ करे।
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2023