पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गुजराती नववर्षानिमित्त सर्व गुजराती जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि प्रगती घेऊन येवो, अशी मनोकामना त्यांनी केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:
"सर्व गुजरातींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा...!!
आजपासून सुरू होत असलेले नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो, आरोग्य निरामय राहो आणि प्रगतीचा सोपान चढता राहो याच मनोकामनेसह नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.....!"
સૌ ગુજરાતીઓને નવા વર્ષની હૃદયપૂર્વકની શુભકામનાઓ…!!
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2021
આજથી પ્રારંભ થતું નવું વર્ષ….આપના જીવનમાં સુખ અને સમૃદ્ધિનો ઉજાસ પાથરે, આરોગ્ય નિરામય રહે તથા પ્રગતિના નવા સોપાન સર કરનારું બની રહે એવી અંતઃકરણ પૂર્વકની મનોકામના સાથે નૂતન વર્ષાભિનંદન.....॥