पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरब प्रजासत्ताक इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचे हार्दिक स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी 24-26 जानेवारी 2023 या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारताच्या दौऱ्यावर दुसऱ्यांदा आलेले, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सिसी हे भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असतील.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी, भारतात आपले स्वागत आहे. आमच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून आपली ऐतिहासिक भारत भेट ही सर्व भारतीयांसाठी खूप आनंदाची बाब आहे. उद्याच्या आपल्या बरोबरच्या संवादाची वाट पाहत आहे @AlsisiOfficial"
Warm welcome to India, President Abdel Fattah el-Sisi. Your historic visit to India as Chief Guest for our Republic Day celebrations is a matter of immense happiness for all Indians. Look forward to our discussions tomorrow. @AlsisiOfficial
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2023