पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच त्यांनी प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य लाभावे याकरिता प्रार्थना केली आहे. आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आपल्या नागरिकांना उत्तम दर्जाच्या आणि परवडण्याजोग्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध होतील याची सुनिश्चिती करण्यामध्ये आयुष्मान भारत आणि पंतप्रधान जनौषधी योजना अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. गेल्या 8 वर्षांच्या काळात वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात वेगाने परिवर्तन घडून आले आहे, अनेक नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरु झाली आहेत असे देखील त्यांनी सांगितले. असंख्य युवकांच्या आकांक्षांना नवे पंख मिळवून देण्याच्या दृष्टीने स्थानिक भाषेत वैद्यकीय शिक्षण सुरु करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती त्यांनी दिली.

ट्विट संदेशांच्या मालिकेद्वारे पंतप्रधान म्हणाले;

"आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥

“जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्याचे वरदान लाभो हीच सदिच्छा. आजचा दिवस आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील दिवस आहे. त्यांच्या कठोर परिश्रमांमुळेच आपली पृथ्वी सुरक्षित राहिली आहे.”

“भारताच्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी भारत सरकार अथक प्रयत्न करत आहे. आपल्या नागरिकांना उत्तम दर्जाच्या आणि परवडण्याजोग्या आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची सुनिश्चिती करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा योजना आपल्या देशात कार्यरत आहे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.”

“पंतप्रधान जनौषधी सारख्या योजनांच्या लाभार्थ्यांशी जेव्हा मी बोलतो  तेव्हा मला अत्यंत आनंद होतो. किफायतशीर दरात आरोग्य सुविधा पुरविण्यावर आपण भर दिल्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाच्या आरोग्यसेवाविषयक खर्चात लक्षणीय बचत होईल याची खात्री झाली आहे. आणि त्याच वेळी आपण एकंदर स्वास्थ्य क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी आपल्या आयुष क्षेत्राची कक्षा अधिक वाढवून बळकट करत आहोत.”

“गेल्या 8 वर्षांमध्ये वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात वेगाने परिवर्तन घडून आले आहे. अनेक नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरु झाली आहेत. असंख्य युवकांच्या आकांक्षांना नवे पंख मिळवून देण्याच्या दृष्टीने स्थानिक भाषेत वैद्यकीय शिक्षण शक्य करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.”

 

 

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
ASER report brings good news — classrooms have recovered post Covid

Media Coverage

ASER report brings good news — classrooms have recovered post Covid
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 31 जानेवारी 2025
January 31, 2025

PM Modi's January Highlights: From Infrastructure to International Relations India Reaching New Heights