पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान दिनाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आशा व्यक्त केली की राजस्थान सतत प्रगतीच्या नवीन शिखरांवर पोहोचत राहील आणि भारताच्या विकासयात्रेत महत्त्वपूर्ण योगदान देत राहील.
'एक्स' या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:
“अद्भुत साहस आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या राजस्थानमधील माझ्या सर्व बांधवांना राजस्थान दिनाच्या अनंत शुभेच्छा. तेथील मेहनती आणि प्रतिभाशाली लोकांच्या सहभागातून हे राज्य विकासाचे नवनवीन मापदंड निर्माण करत राहो आणि देशाच्या समृद्धीत अमूल्य योगदान देत राहो, हीच माझी मनःपूर्वक प्रार्थना आहे.”
अद्भुत साहस और पराक्रम के प्रतीक प्रदेश राजस्थान के अपने सभी भाई-बहनों को राजस्थान दिवस की अनेकानेक शुभकामनाएं। यहां के परिश्रमी और प्रतिभाशाली लोगों की भागीदारी से यह राज्य विकास के नित-नए मानदंड गढ़ता रहे और देश की समृद्धि में अमूल्य योगदान देता रहे, यही कामना है।
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2025