पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
नारी शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला आणि लवचिकतेला सलाम. तसेच विविध क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीचे कौतुक पंतप्रधानांनी केले आहे.
एक्स वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा! आम्ही आपल्या नारी शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला आणि लवचिकतेला सलाम करतो तसेच त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करतो. आमचे सरकार शिक्षण, उद्योजकता, कृषी, तंत्रज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रात पुढाकार घेऊन महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या दशकातील आम्ही केलेल्या कामांवरुनही हे दिसून येते.”
Greetings on International Women's Day! We salute the strength, courage, and resilience of our Nari Shakti and laud their accomplishments across various fields. Our government is committed to empowering women through initiatives in education, entrepreneurship, agriculture,…
— Narendra Modi (@narendramodi) March 8, 2024