लेबनान मधील बैरुत शहरात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
“लेबनान मधील बैरुत शहरात झालेल्या भीषण स्फोटाबद्दल धक्का बसला असून या दुर्घटनेमुळे झालेल्या वित्त हानीबद्दल दुःख झाले आहे. या स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती आणि जखमींबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Shocked and saddened by the large explosion in Beirut city leading to loss of life and property. Our thoughts and prayers are with the bereaved families and the injured: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 5, 2020