इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांच्या वृत्ताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी भारत इस्रायलसोबत एकजुटीने उभा असून निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत भारतीयांच्या सद्भावना आणि प्रार्थना असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्यांच्या वृत्ताने खूप दुःख झाले. आमच्या सद्भावना आणि प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायलसोबत एकजुटीने उभे आहोत."
Deeply shocked by the news of terrorist attacks in Israel. Our thoughts and prayers are with the innocent victims and their families. We stand in solidarity with Israel at this difficult hour.
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2023