पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भागलपूर येथे स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी या घटनेशी संबंधित परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री श्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली. प्रशासन मदत आणि बचाव कार्यात सक्रीय असून पीडितांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे असे त्यांनी सांगितले.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;
"बिहारमधील भागलपूर येथे स्फोटामुळे झालेल्या जीवितहानीची बातमी अस्वस्थ करणारी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी कामना करतो. घटनेशी संबंधित परिस्थिती संदर्भात मुख्यमंत्री @NitishKumar जी यांच्याशी बोललो. प्रशासन मदत आणि बचाव कार्यात सक्रीय आहे. आणि पीडितांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे."
बिहार के भागलपुर में धमाके से हुई जनहानि की खबर पीड़ा देने वाली है। मैं घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं। घटना से जु़ड़े हालातों पर मुख्यमंत्री @NitishKumar जी से भी बात हुई। प्रशासन राहत और बचाव कार्यों में लगा हुआ है, और पीड़ितों को हर संभव सहायता दी जा रही है।
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2022