पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद-महेसाणा या(64.27 किमी) मार्गाच्या गेज परिवर्तनाचा प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल संतोष व्यक्त केला आहे.
श्री मोदी म्हणाले की, उद्योग आणि दळणवळणासाठी तो उत्तम मार्ग ठरेल.
या प्रकल्पामुळे रेल्वेच्या गाड्यांचे परिचालन सुरळीत होईल, अहमदाबाद आणि महेसाणा दरम्यानचा प्रवास वेळ कमी होईल तसेच अहमदाबाद-दिल्ली या प्रमुख मार्गावरील मालवाहतूक क्षमता वाढेल.
रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
" हा व्यापार आणि दळणवळणासाठी एक उत्तम प्रकल्प आहे."
Great for commerce and connectivity. https://t.co/qxV2jwKz9r
— Narendra Modi (@narendramodi) March 6, 2023