भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (इस्रो) एक्सपोसॅट उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.
भारताला अभूतपूर्व उंचीवर नेल्याबद्दल त्यांनी अंतराळ समुदायाचे तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
"वर्ष 2024 ची दमदार सुरुवात केल्याबद्दल आपल्या शास्त्रज्ञांना धन्यवाद! हे प्रक्षेपण अवकाश क्षेत्रासाठी एक संस्मरणीय बाब असून त्याद्वारे या क्षेत्रात भारताचे प्राबल्य वाढेल. भारताला अभूतपूर्व उंचीवर नेल्याबद्दल आपल्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आणि संपूर्ण अंतराळ समुदायाचे अभिनंदन."
A great start to 2024 thanks to our scientists! This launch is wonderful news for the space sector and will enhance India's prowess in this field. Best wishes to our scientists at @isro and the entire space fraternity in taking India to unprecedented heights. https://t.co/4O4F6kRpEX
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2024