देशाचा ईशान्य प्रदेश प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून उदयाला येत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या भागात वाढत असलेला पर्यटन उद्योग म्हणजेच या भागाचे अधिकाधिक समृध्द होणे आहे, असे ते म्हणाले.
वर्ष 2022 मध्ये देशातील 11.8 दशलक्ष पर्यटकांनी तर 1 लाख परदेशी पर्यटकांनी अशा विक्रमी प्रमाणात ईशान्य भागाला भेट दिली. ही माहिती देण्यासाठी केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांनी केलेल्या ट्विट संदेशावर पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात;
“अत्यंत आनंददायक ट्रेंड. या ठिकाणच्या पर्यटनातील वाढ म्हणजेच या भागाचे अधिक समृद्ध होणे.”
Gladdening trend. Increased tourism means increased prosperity in the region. https://t.co/hCwjqEef0o
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2023