जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी 7 कस्टम हायरिंग सेंटर्स, बचतगटांसाठी 9 पॉली ग्रीन हाऊससह अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपाल कार्यालयाची ट्विट शृंखला सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले;
"उद्घाटन केलेल्या विकासकामांची उल्लेखनीय व्याप्ती जम्मू आणि काश्मीरमधील लोकांसाठी, विशेषत: आकांक्षी जिल्ह्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याच्या आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे."
The remarkable range of developmental works inaugurated stand as a testament to our commitment towards enhancing the quality of life for the people of Jammu and Kashmir, especially the aspirational districts. https://t.co/4nFo6RWuul
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2023