भारतीय इतिहास आणि संस्कृती याविषयी जगात निर्माण होत असलेल्या उत्साहाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारतीय संस्कृतीचा सूर संपूर्ण जगात दुमदुमत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांच्या परदेश दौऱ्याची काही दृश्ये सामाईक करत पंतप्रधान मोदी म्हणाले की आपला इतिहास आणि संस्कृती याविषयी इतक्या मोठ्या प्रमाणातील हा उत्साह अतिशय आनंददायी आहे.
एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेः
"भारतीय संस्कृतीचा सूर जगात दुमदुमत आहे! मी जिथे जिथे जातो, आपला इतिहास आणि संस्कृती याविषयी मला प्रचंड उत्साह दिसतो जे अतिशय आऩंददायी आहे. ही पहा याची एक झलक…"
Indian culture resonates globally!
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2024
Wherever I go, I see immense enthusiasm towards our history and culture, which is extremely gladdening. Here is a glimpse… pic.twitter.com/IXmOCYgYgW